चोहोट्टा बाजार : शाळाबाह्य मुलांना शोधून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चोहोट्टा बाजार परिसरात शुक्रवारी शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला.प्रत्येक मुलाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची मोहीम शासनाच्यावतीने राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात शाळाबाह्य मुलांचा शोध प्रशासनाच्यावतीने घेण्यात येऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येत आहेत. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी चोहोट्टा बाजार येथील वीट भट्ट्यांना भेट देऊन शाळाबाह्य मुलांचा स्वत: शोध घेतला. त्यानंतर त्यांनी चोहोट्टा बाजार गावात भेट दिली. यावेळी त्यांनी तीन मुख्य ठिकाणी सार्वजनिक सुलभ शौचालयेसुद्धा मंजूर केली; तसेच शासकीय विश्रामगृह विद्यार्थ्यांच्या हितासाठी वापरात आणण्यास प्राधान्य देण्याच्या सूचनासुद्धा त्यानी ग्रामपंचायतला दिल्या. यावेळी दिलीप वडाळ, ग्रामपंचायत सदस्य फयूम शहा आशकान, पवन वर्मा उपस्थित होते.(वार्ताहर)
शाळाबाह्य मुलांच्या शोधात सीईओ पोहोचले वीट भट्ट्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 6:28 PM