लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या विविध विभागात बुधवारी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आकस्मिक भेट दिली. यावेळी आरोग्य व अर्थ विभाग जवळपास रिकामा तर इतरही विभागातील अधिकारी-कर्मचारी मिळून ३२ अनुपस्थित असल्याचे उघड झाले. याप्रकरणी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस दिली जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या अनेक विभागातील अधिकारी-कर्मचारी जागेवरच नसतात. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्यांसह तसेच विविध कार्यालयीन कामांचा खोळंबा होतो. हा प्रकार सातत्याने सुरूच असतो. कर्मचाºयांना अंकुश लावण्यात वरिष्ठ अधिकारी अपयशी ठरतात. त्याचाच फायदा संबंधितांकडून घेतला जातो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी बुधवारी आकस्मिक झाडाझडती घेतली. त्यामध्ये अर्थ विभागात कमालीचा गोंधळ दिसून आला. सहायक लेखाधिकारी जी. डी. उघडे, डी. टी. दखणे, कनिष्ठ लेखाधिकारी एस. आर. घोरमोडे, व्ही. जी. रोकडे, वरिष्ठ सहायक एम. डी. बोरगावकर, एस. डी. ठोंबरे, एस. पी. राऊत, कनिष्ठ सहायक वाय. जी. कुकडे, वाहन चालक भालतिलक, हातोलकर व परिचर व्ही. आर. भगत अनुपस्थित होते. आरोग्य विभागात सहायक प्रशासन अधिकारी आर. व्ही. बहिर्डे, सांख्यिकी पर्यवेक्षक आर. टी. मुळे यांच्यासह आर. एस. मुंढे, आर. एम. चौबे, पी. डी. गवळी, मो. फैयाज एस. रहमान, एस. व्ही. डोंगरे, एच. बी. राठोड, रेणुका शेगोकार, वाहन चालक जी. एन. ताकझुरे, आर. पी. बानोले, बांधकाम विभागात धनश्री जानूनकर, शालिनी जाटे, ए. एस. वाघ, सरिता ठाकरे. सामान्य प्रशासन विभागात विस्तार अधिकारी शिवकन्या ठाकरे, भुतेकर, समाजकल्याण विभागात एम. डी. थारकर, डी. एम. पुंड, रोजगार हमी योजना कक्षात सहायक लेखाधिकारी श्याम इंगळे अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी, समाजकल्याण अधिकारी यांना पत्र देत विचारणा केली आहे. या सर्व कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस दिली जाणार आहे.
‘सीईओं’नी घेतली झाडाझडती; ३२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 2:40 PM