कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत आदर्श शिक्षक विलास देशमुख होते. प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्या नीता संदीप गवई, डॉ. केशव काळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल तैली, सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख आदी उपस्थित होते. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कोविड योद्धयांना सन्मानित करण्यात आले. प्रसंगी लक्ष्मी नगर स्थित संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक, आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. दरम्यान ज्येष्ठ नागरिक संघ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिने कलावंत शाम पिंपळकर यांनी, संचालन रामभाऊ वानखडे यांनी केले. आभार रामेश्वर तायडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदकिशोर देशमुख, श्रीकृष्ण कुकडे, विष्णुपंत तवाळे, राजेंद्र पोहेकार, गजानन उमाळे, उमेश देशमुख यांनी प्रयत्न केले.
यांचा केला सन्मान
डॉ. वहीदोदिन पटेल,डॉ शुभांगी काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ रुपाली पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना महल्ले, आरोग्य कर्मचारी विलास खडसे, रामेश्वर हिरुळकर, सविता केदार, सलोनी पोटे, सुकेशनी तेलगोटे, शीतल कुकडे, पल्लवी भागवत,अजय मंगळे, अनुकूल ठाकरे, प्रकाश कोल्हे, वर्षा ठाकरे, गट प्रर्वतक अमिता वानखडे, वर्षा ढोके, रिता गवई, उज्जवला वाठूरकर,सविता मनवर आदींना सन्मानित करण्यात आले.