संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांपैकी ५६ शेतकर्यांना कर्जमाफीचे प्रमाण पत्र देण्यात आले; मात्र प्रमाणपत्र दिल्यानंतर सात दिवसांचा कालावधी उलटून जात असला तरी, कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या शेतकर्यांच्या कर्जखात्यात मंगळवारपर्यंत छदामही जमा करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम केव्हा जमा होणार आणि शेतकर्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शे तकर्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्यांना दीड लाख रु पयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित पर तफेड करणार्या शेतकर्यांना २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ा तील थकबाकीदार शेतकर्यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्याचे काम २२ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले. ऑनलाइन भरलेल्या अर्जांंच्या पडताळणीत जिल्हय़ात १ लाख ९१ हजार १८७ शे तकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकर्यांचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ५६ शेतकर्यांना १८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. सात दिवसांचा कालावधी उलटून गेला; परंतु अद्यापही कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या शेतकर्यांच्या कर्जखा त्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली नाही. कर्जखा त्यात छदामही जमा झाला नसल्याने, प्रमाणपत्र दिलेल्या शे तकर्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम केव्हा जमा होणार आणि संबंधित शेतकर्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पातूर तालुक्यात पाच शेतकर्यांकडून परत घेतले कर्जमाफीचे प्रमाणपत्र!कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांपैकी ५६ शेतकर्यांना १८ ऑक्टोबर रोजी कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यापैकी पातूर तालुक्यात पाच शेतकर्यांकडून कर्जमाफीचे प्रमाणपत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधित गटसचिवांकडून परत घेण्यात आले. त्यामध्ये भंडारज येथील प्रमोद रामभाऊ गव्हाळे, आस्टूलचे पंजाबराव इंगळे, भानोसचे कसमदास राठोड, अंबाशी व माळराजुरा येथील प्र त्येकी एका शेतकर्याकडून कर्जमाफीचे प्रमाणपत्र परत घेण्यात आले.
१ लाख ९१ शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ दूरच!सात दिवसांपूर्वी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या ५६ शेतकर्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळाला नाही. त्यानुषंगाने कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ा तील उर्वरित १ लाख ९१ हजार १३१ शेतकर्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणे दूरच असल्याचे वास्तव आहे.
कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या जिल्हय़ातील ५६ शे तकर्यांच्या कर्जखात्यात कर्जाची रक्कम जमा करून, जमा केलेल्या कर्जाच्या रकमेची मागणी संबंधित बँकांनी शासनाकडे करावयाची आहे. कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या ५६ शे तकर्यांच्या कर्जखात्यात कर्जाची रक्कम जमा केल्याचा अहवाल अद्याप बँकांकडून प्राप्त झाला नाही.- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)