लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या धर्तीवर कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून सामायिक (सीईटी) परीक्षा घे तली जाणार असून, त्यासाठीची अधिसूचना शासनाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना पाठवली आहे.राज्यात चार कृषी विद्यापीठे असून, अनुदानित व खासगी मिळून राज्यात १९0 कृषी महाविद्यालये असून, बी. एससी. प्रथम वर्षासाठीची प्रवेश क्षमता एकूण १४,७00 आहे. कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने स्पर्धा वाढली आहे. यावर्षी यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली हो ती. परराज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी अभ्यासक्रमाकडे कल वाढला असून, दरवर्षी १0 ते १५ टक्के विद्यार्थ्यांची वाढ होत असल्याने पदवी कृषी (बी. एससी.) सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (एमसीएईआर) दोन वर्षांपूर्वीच घेतला होता; परंतु तयारीच झाली नव्हती. आता तयारी पूर्ण करण्यात आली असून, यावर्षी म्हणजे २0१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून सीईटी घेतली जाणार आहे.
कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून सीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठीची अधिसूचना प्राप्त झाली आहे. कृषी विद्यापीठाने यासंबंधीची तयारी केली आहे.- डॉ.व्ही.एम. भाले, कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.- डॉ. बी. वेंकटस्वरलू, कुलगुरू , व्हीएनएमोव्ही,परभणी.