शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
2
० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?
3
अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा
4
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
5
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
6
"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन?
7
Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री
8
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
9
तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ!
10
PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा
11
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
12
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
13
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
14
Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स
15
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
16
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
17
रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू 
18
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
19
मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत
20
साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश ‘सीईटी’साठी ८६ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:53 AM

१ जानेवारीपासून कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश सीईटीसाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात ८६ हजार ४१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

अकोला: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, सामाजिक विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्र, जैवतंत्रज्ञान, मत्स्यविज्ञान, पशुसंवर्धन आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन या दहा पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २0१९-२0 या शैक्षणिक वर्षापासून राज्य सामाईक परीक्षा (एमएच सीईटी) बंधनकारक केली आहे. १ जानेवारीपासून कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश सीईटीसाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात ८६ हजार ४१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.एमएच सीईटी परीक्षेसोबतच भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणारी आॅल इंडिया एन्ट्रन्स एक्झामिनेशन टेस्ट, जेईई, नीट, एआयईईए-यूजी यापैकी कोणतीही सामाईक प्रवेश प्रक्रिया ग्राह्य धरली जाणार आहे. सामाईक प्रवेश परीक्षेमध्ये एमएच सीईटी, जेईई, नीट, एआयईईए-यूजी प्राप्त झालेल्या गुणांच्या ७0 टक्के गुण आणि पात्रता परीक्षेमध्ये (इयत्ता बारावी विज्ञान परीक्षेत प्राप्त एकूण गुणांच्या ३0 टक्के गुण तसेच प्रचलित पद्धतीनुसार इतर अधिभार यांच्या आधारावर उमेदवाराची गुणवत्ता निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून संकेतस्थळावर आॅनलाइन नोंदणी व प्रवेश अर्ज पुष्टीकरण १ जानेवारी ते २३ मार्च २0१९ मुदत दिली आहे, तसेच आॅनलाइन नोंदणी व प्रवेश पुष्टीकरण ५00 रुपये अतिरिक्त विलंब शुल्कासाठी २६ मार्च ते ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. एमएच सीईटी परीक्षा दिल्याशिवाय विद्यार्थ्यांनी कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी आॅनलाइन नोंदणी करावी. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणexamपरीक्षा