नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु असताना किंवा पूर परिस्थिती असताना पूर पाहण्यास गर्दी करु नये. पुलावरून पाणी वाहत असतांना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे व नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेऊन सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थितीत राहून योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.
शेवटच्या श्रावण सोमवारी
जिल्ह्यात बरसला पाऊस !
श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि पोळा सणाला सायंकाळी जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस बरसला. अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात मेघगर्जनेसह पाऊस बरसला. त्यामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचले होते.