चंडिका माता आपत्कालीन पथकाचे प्रमुख रंजित घोगरे, योगेश विजयकर, वीरू देशमुख, महेश वाघमारे, प्रज्वल कांबे, शेखर भदे, आकाश मुढाले उज्ज्वल कांबे, तुषार अढाऊ, अनिकेत खंडारे आदी पूरग्रस्त दुर्गम भागांमध्ये संसारोपयोगी साहित्य, धान्याच्या किट, मेडिकल साहित्य आदी सेवाकार्य राबवीत आहेत. चिपळूण शहरामध्ये महाराष्ट्रातून अनेक भागांत मदत येत आहे. मात्र, जी दुर्गम गावे आहेत. त्या गावांत मदत कमी प्रमाणात होत आहे आणि मदतीमध्ये पाण्याची बॉटल, बिस्कीट यांचे प्रमाण जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पथक सेवाकार्य राबवीत आहे. या भागातील नागरिकांसाठी अधिकाधिक मदत पाठवावी. येथे अनेकांच्या घरांमध्ये चिखल साचल्यामुळे राहायला जागा नाही. अनेकांची घरे पडलेली आहेत, असे चंडिका माता आपत्कालीन पथक उपाध्यक्ष योगेश विजयकर यांनी सांगितले.
फोटो: