अकाेला- केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असा दावा करणाऱ्या माजी मंत्री चंद्रकात दादा पाटील यांना शेतकरी जागर मंचने खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे
केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच असून कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणतील असा दावा भाजपाच्यावतीने केला जात आहे या दाव्याच्या पृष्टर्थ भाजपच्या काेणत्याही नेत्याने आपली बाजू मांडावी शेतकरी जागर मंच या दाव्यातील फाेलपणा समाेर आणेल, असा प्रतिदावा शेतकरी जागर मंचच्यावतीने केला जात आहे. याकरिता जागर मंचच्यावतीने जिल्हास्तरापासून तर केंद्र स्तरावरच्या सर्व भाजप नेत्यांना चर्चेचे आमंत्रण दिले जात आहे
१५ फेब्रुवारी शेतकरी जागर मंचच्यावतीने प्रशांत गावंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना याबाबत चर्चा करण्याची विनंती केली हाेती. त्यावर चंद्रकात पाटील यांनी हाेकार दर्शवून पुढील आठवड्यात वेळ देताे असे स्पष्ट केेले हाेते. मात्र त्यानंतर पाटील यांनी शेतकरी जागर मंचला चर्चेसाठी वेळ दिलेला नाही. त्यामुळे अखेर पाटील यांना पत्र पाठवून शेतकरी जागर मंचने स्मरण दिले आहे यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेसह भाजप जिल्हाध्यक्ष यांनाही वेळ मागितली हाेती मात्र त्यांनीही वेळ दिली नसल्याचेही पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.