अकोला: ईद-ए-मिलाद उत्सवामुळे शहरात मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुकीत शहरासह जिल्ह्यातील मुस्लीम बांधव सहभागी होतात. मिरवणूक ताजनापेठ पोलीस चौकी, फतेह चौक, चांदेकर चौक, मनपा चौक, जयहिंद चौक, अगरवेस, दगडीपूल, लक्कडगंज, माळीपुरा, तेलीपुरा अशी निघणार असल्याने मिरवणुकीला वाहतुकीचा अडथळा होऊ नये, यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक मार्गात बदल करीत, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.रविवारी शहरात ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये जिल्ह्यातील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक जात असल्याने, मिरवणुकीस वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस वाहतूक नियंत्रण विभागाने वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डाबकी रोडकडे जाणारी वाहतूक नवीन बसस्थानक, अशोक वाटिका, नेहरू पार्क, भगतसिंह चौक, वाशिम बायपास, हरिहरपेठ, जुने शहर, डाबकी रोड, लक्झरी बसस्टॅन्डकडे येणारी आपातापा चौक, रेल्वे पूल, रेल्वे स्टेशन, अग्रसेन चौक, टॉवर चौक, धिंग्रा चौक, अशोक वाटिका, नेहरू पार्क चौक, भगतसिंह चौक, लक्झरी बसस्टॅन्ड, अकोट स्टॅन्डकडे जाणारी वाहतूक अकोट स्टॅन्ड ते अग्रसेन चौक, टॉवर चौक, धिंग्रा चौक, अशोक वाटिका, मेन हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय आणि डाबकी रोडकडे जाणारी वाहतूक डाबकी रोड, भांडपुरा चौक, किल्ला चौक, हरिहरपेठ, वाशिम बायपास चौक, लक्झरी स्टॅन्ड, भगतसिंह चौक, नेहरू पार्क चौक, अशोक वाटिका चौक, धिंग्रा चौक, टॉवर चौक, अग्रसेन चौक, अकोट स्टॅन्ड पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
ईद-ए-मिलाद मिरवणुकीमुळे वाहतूक मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 2:46 PM