वाडेगाव : चान्नी फाटा- तुलगा या रस्त्याची चाळणी झाली असून, रस्त्यावर प्रवास करताना वाहनचालकास कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
तुलंगा, चतारी, सांगोळा शहापूर, लावखेड आदी गावांतील ग्रामस्थांसाठी मुख्य बाजारपेठ वाडेगाव आहे. वाडेगाव येथे दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. वाडेगावाशी जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. सद्य:स्थितीत रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. रस्त्याची चाळण झाल्याने वाहनचालकांना वाहन नेताना कसरत करावी लागते. तसेच रस्त्याचे रुंदीकरण जास्त नसल्याने अपघाताच्या घटना घडतच असतात. त्यामुळे या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (फोटो)
--------------------------------
रस्त्यावर पूर्णपणे खड्डे पडले असून, या मार्गावर अनेकांचे अपघात झाले आहेत. संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी.
- सुमेध हातोले, वंचित युवक आघाडी, तालुका महासचिव, पातूर.
----------------------------------------------
या मार्गाने झालेल्या अपघातामुळे अनेकांना अपंगत्व आले आहे. याकडे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी.
सदानंद भुस्कुटे,
माजी ग्रा.पं. सदस्य, वाडेगाव.