अकोला: मतदार जनजागृती अभियानद्वारे वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांची नोंदणी करणे, नावातील दुरुस्ती करण्यासह मयत मतदारांची नावे वगळणे आणि घराचा पत्ता बदलून दोनपैकी एकाच ठिकाणच्या मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. त्यानुषंगाने अद्ययावत मतदार याद्या तयार होणे अपेक्षित असताना ‘बीएलओं’च्या निष्क्रिय कारभारामुळे याद्यांमध्ये घोळ असल्याची माहिती आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास मतदानाच्या दिवशी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून, मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता मतदार जनजागृती मोहीम राबवली जात आहे. अर्थात, देशभरातील हा उत्सव नियोजनबद्धदरीत्या व शांततेत पार पडावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह उमेदवारांचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी, मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम राबवली असता, नवमतदारांसह अनेकांनी मोहिमेत सहभाग नोंदवून नाव नोंदणीसह दुरुस्त्या सुचवल्या. मतदानासाठी मतदार सज्ज होत असतानाच वर्षानुवर्षे मतदार याद्यांमध्ये होत असलेल्या चुकांचा फटका नव्या तसेच जुन्या मतदारांना बसत असल्याची माहिती आहे. मतदार याद्यांमधील नावासह पत्त्यामध्ये अनेक त्रुटी कायम असल्याने ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. काही कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ््या यादीत विभागल्या गेल्याची शहरात चर्चा आहे. यामुळे त्यांचे मतदानाचे केंद्र बदलल्या जाणार आहे. अर्ज भरून देताना संबंधित रहिवासी सोसायटी, परिसराचे नाव व पत्ता योग्यरीत्या लिहून देतात. तरीही ऐन वेळेवर दुसऱ्याच यादीत नावाचा समावेश होतो कसा, असा प्रश्न सर्वसामान्य मतदार उपस्थित करू लागले आहेत.शिक्षकांनी घेतली मध्यस्थांची मदतयादीत मतदारांची नावे समाविष्ट करणे, मयत व्यक्तींची नावे वगळणे यासाठी निवडणूक विभागाने जिल्हा परिषदसह महापालिक ा शिक्षकांची मदत घेतली होती. शिक्षकांनी या कामासाठी त्या-त्या भागातील मध्यस्थांची मदत घेऊन यादीचे सोपस्कार पूर्ण केल्याची माहिती आहे. अर्थात या प्रकारामुळे बोगस मतदानाला खतपाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्लम एरियात संख्या वाढली!मतदार जनजागृती अभियानादरम्यान राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये प्रामुख्याने स्लम एरियात मतदारांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. काही भागात बोगस मतदारांच्या नावाचा याद्यांमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. असे प्रकार निवडणूक विभाग उजेडात आणणार काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
चुकीच्या पत्त्यांमुळे कुटुुंबे विभागलीमतदारांकडून अर्ज सादर करताना पुरेपूर खबरदारी घेतली जात असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात मतदार यादीत नावाचा समावेश होत असताना मतदारांचे पत्ते बदलल्या जात असल्याचे दिसून येते. या बाबतीत नेमकी चूक होते कोठे, असा प्रश्न मतदारांमध्ये निर्माण होत आहे. चुकीच्या पत्त्यांमुळे एकाच कुटुुंबातील व्यक्ती कागदोपत्री विभागल्या जात असल्याचे चित्र समोर येते.