अकोला : प्रहार जनशक्ती पार्टीच्या अकाेला जिल्हा कार्यकारिणीची घाेषणा करण्यात आली असून प्रथमच दाेन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी ॲड. सुधाकर खुमकर, कुलदीप वसू यांच्याकडे विभागून देण्यात आली. या कार्यकारिणीत महानगर अध्यक्षपदी मनोज पाटील तर प्रहार युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सुशील पुंडकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी पार पडलेल्या बैठकीत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू आणि प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या आदेशाने प्रहारचे प्रदेश कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, प्रदेश सरचिटणीस पुरुषोत्तम आवारे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीतील निवडक पदे जाहीर करण्यात आली.
अशी आहे कार्यकारिणी : जिल्हा उपाध्यक्ष निखिल गावंडे, अरविंद पाटील, महासचिव राजेश खारोडे, जिल्हा संघटक नीलेश ठोकळ, अकोला लोकसभा मतदारसंघ प्रमुख नीरज गायकवाड, मूर्तिजापूर विधानसभा संपर्क प्रमुखपदी राजकुमार नाचणे. तालुकाध्यक्ष पदावर तुषार पाचकोर, अकोट, मुन्ना बिहाडे, तेल्हारा, राजू उबाळे, बाळापूर, शुभम थिटे, पातूर, राम पाटील, बार्शिटाकळी, अमोल वानखडे, मूर्तिजापूर, श्याम वाघमारे, अकोला तर शहर अध्यक्ष म्हणून सागर उकंडे, अकोट, विक्की मल, तेल्हारा, सज्जाद खान, बाळापूर, मोहम्मद अजगर मो. अफसर, पातूर, सागर पुंडकर, मूर्तिजापूर, संतोष पवार, बार्शिटाकळी यांची नियुक्ती करण्यात आली.
समाजसेवा हा प्रहारचा स्थायिभाव आहे. ताे कायम ठेवत पक्षाची राजकीय वाटचाल अधिक वेगाने व मजबुतीने हाेईल यासाठी सर्वांना साेबत घेण्याचा प्रयत्न सातत्याने राहील.
ॲड. सुधाकर खुमकर