लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव : पातूर तालुक्यातील चतारी आणि सस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी युवा सेनेच्यावतीने वन विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे. चतारी परिसरामध्ये गेल्या २0 ते २५ दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरामध्ये शेतकरी, शेतमजूर, शेती कामासासाठी जाण्यास घाबरत आहेत. सध्या परिसरामध्ये खरीप रब्बी हंगामाची कामे सुरू आहेत.कापूस वेचणी, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, कडधान्य यांची काढण्याची कामे सुरू आहेत. बहुतेक शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतात थांबून असतात. अनेकांचे गाय, म्हशी, शेळी, मेंढीपालन शेतात आहे. त्यामुळे वन विभागाने शोधमोहीम राबवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी युवा सेनेने निवेदनात केली आहे. या निवेदनावर वन विभाग अधिकारी एच. आर. राठोड, एम.एस. राठोड, ए. एस. आडे यांनी बिबट्याला लवकरच जेरबंद करू, अशी ग्वाही दिली. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वर सौंदळे, अमर लखाडे, सुमित भालतिलक, मंगेश मुळे, श्याम राखोंडे, प्रशांत उगले, सचिन बनिये, आशिष महाले, ईश्वर तराळे, संतोष इंगळे, अमोल ढोरे, शरद वाडेकर, ज्ञानेश्वर डिवरे, योगेश ढोरे, मंगेश बंड, दीपक पुरी, यशवंतराव सरदार, दिनेश मांजरे, पुरुषोत्तम मुंडे आदींनी निवेदन दिले.
पातूर तालुक्यकातील चतारी, सस्ती परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 8:09 PM
वाडेगाव : पातूर तालुक्यातील चतारी आणि सस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी युवा सेनेच्यावतीने वन विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे.
ठळक मुद्देयुवा सेनेचे वन विभागाच्या अधिकार्यांना निवेदन