शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

‘सीएचबी’चे मानधन महाविद्यालयांकडून सुटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 1:15 PM

मानधनाचा हा निधी महाविद्यालयांकडून सुटत नसल्याने अद्यापही ‘सीएचबी’ प्राध्यापकांना मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

अकोला : तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना गतवर्षीचे मानधन न मिळाल्याने त्यांची दिवाळी अंधारात गेली. सहा कोटींचे अनुदान मानधनासाठी आल्यावर उच्च व शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे ते महाविद्यालयांच्या खात्यात वळते करण्यात आले; मात्र मानधनाचा हा निधी महाविद्यालयांकडून सुटत नसल्याने अद्यापही ‘सीएचबी’ प्राध्यापकांना मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.उच्च शिक्षण घेऊनही शिक्षकांना नोकरी नाही. तासिका तत्त्वावर मिळणाऱ्या मानधनातून सीएचबी शिक्षक कसेबसे उदरनिर्वाह करीत आहेत. राज्य शासनाने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी आदेशानुसार, सीएचबी प्राध्यापकांना महिन्याकाठी १५ हजार रुपये मानधनाचा निर्णय घेतला आहे; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा आक्षेप सीएचबी प्राध्यापकांनी नोंदविला आहे. विभागातील १५२ महाविद्यालयांत सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. २०१८-१९ मधील सीएचबी प्राध्यापकांच्या थकीत मानधनासाठी सहा कोटी रुपये शासनाने पाठविले; परंतु नियोजनाअभावी ही रक्कम दिवाळीत मिळाली नाही. तत्कालीन सहसंचालक संजय जगताप यांनी आॅगस्टपूर्वी मानधन दिले जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु मध्यंतरी जगताप यांची बदली झाली आणि मानधनाचा विषय रखडला. त्यानंतर गतवर्षीचे ८२ महाविद्यालयांतील सीएचबी प्राध्यापकांचे मानधन प्राचार्यांच्या खात्यात जमा झाले होते; मात्र ६८ महाविद्यालयांतील सीएचबी प्राध्यापकांचे मानधन तांत्रिक कारणांनी रखडले होते. तांत्रिक त्रुटी दुरुस्तीनंतर बहुतांश महाविद्यालयांकडे हा निधी वळता करण्यात आला असूनही सीएचबी प्राध्यापकांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक