शिरपूरजैन (जि. वाशिम) : नियमबाह्य कामकाजप्रकरणी येथील नर्मदा महिला बचतगटाच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्वस्त धान्य दुकानाला मंगळवारी 'सील' ठोकण्यात आले. ही कारवाई मालेगावच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केली.शिरपूर येथील नर्मदा महिला बचत गटामार्फत स्वस्त धान्य दुकान चालविण्यात येते. यामार्फत शेकडो कार्डधारकांना राशनचा माल वितरीत केला जातो; मात्र मागील काही दिवसांपासून कार्डधारकांना मालाचे वितरण नियमप्रमाणे होत नसल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन तहसीलदार मेटकरी यांनी २८ जून रोजी नर्मदा बचतगटाच्या राशन दुकानाला भेट दिली. यावेळी केलेल्या तपासणीत दुकानामधील धान्य वितरणासंबंधीच्या ह्यरेकॉर्डह्णमध्ये अनियमितता आढळून आली. त्यामुळे सदर दुकानाला तहसीलदारांनी ह्यसीलह्ण ठोकण्याची कारवाई केली व संपूर्ण ह्यरेकॉर्डह्ण ताब्यात घेतले. यावेळी तहसीलदारांसमवेत कर्मचारी ए.एफ.सैय्यद, रवि राऊत, वाय.आर.हातेकर, चालक घुगे, बी.एस.घुगे, दत्ता ताकतोडे आदिंची उपस्थिती होती.
स्वस्त धान्य दुकानाला ‘सील’!
By admin | Published: June 29, 2016 1:09 AM