अकोला, दि. २0- जिल्हय़ातील शेकडो कोल्हापुरी बंधार्यांची सद्यस्थिती तपासून त्याचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्यासाठी चौकशी समितीचा दौरा मंगळवारपासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे, ही समिती स्थापन करण्यालाही आता चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. ह्यलोकमतह्णने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर समितीकडून ही तपासणी होत आहे.गेल्या काही वर्षात १00 हेक्टरपेक्षा कमी सिंचन क्षमता असलेल्या कोल्हापुरी बंधार्यांची कामे जिल्हा परिषदेने लघू पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर यांच्याकडे दिली. त्या ८४ पैकी केवळ १४ बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली. उर्वरित कामे हस्तांतरित करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने पाठपुरावा केला; मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. याबाबत ह्यलोकमतह्णने वृत्त लावून धरले. ८ नोव्हेंबर २0१६ रोजी स्थायी आणि जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत गंभीर चर्चा झाली. सभेतच मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी तीन सदस्यांची समिती बंधार्यांची सद्यस्थिती तपासण्यासाठी गठित केली. त्या बंधार्यांची तपासणी करण्यासाठी चार महिन्यांपर्यंंंत स्थानिक स्तरकडून माहितीच मिळाली नाही. त्यानंतर जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत ७२ बंधार्यांची जुजबी माहिती देण्यात आली. समितीचे सदस्य गोपाल कोल्हे यांनी बंधार्याचे सुरुवातीचे अंदाजपत्रक, त्यामध्ये झालेली वाढ, वाढीव निधीतून केलेले काम, त्यातून किती सिंचन वाढले, शेतकर्यांना कोणता लाभ झाला, या मुद्यांची माहिती मागवली. त्यावेळी १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान दौराही ठरवण्यात आला होता. त्यानंतर आता हा दौरा होत आहे. या तीन दिवसांच्या दौर्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.व्ही. देशमुख, स्थानिक स्तरच्या कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे. समितीच्या तपासणीनंतर हस्तांतरित होणार्या बंधार्यांचा अहवाल सादर केला जाणार आहे.
आजपासून बंधा-यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2017 2:29 AM