लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिका प्रशासनाने गतवर्षी वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांची ‘जिओ टॅगिंग’द्वारे नोंद घेण्यात आली होती. त्यापैकी किती वृक्ष जिवंत आहेत, यासंदर्भात प्रत्यक्षात पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त अजय लहाने यांनी बांधकाम विभागाला दिले असता बांधकाम विभागाने अहवाल तयार केला आहे. यामध्ये वृक्ष लागवडीच्या एकूण ५० टक्के वृक्ष जिवंत असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे. शहराला हिरवा शालू पांघरण्यासाठी मागील तीन वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडून वृक्ष लागवड केली जात आहे. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, सर्वपक्षीय नगरसेवकांसोबतच मनपातील शिक्षकांना एक त्र करून वृक्ष लागवडीसाठी जनजागृती सुरू केली आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून मनपाला गतवर्षी ५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वृक्षांची लागवड करताना त्यांची ‘जिओ टॅगिंग’द्वारे नोंद घेण्यात आली होती. यापैकी किती वृक्ष जिवंत आहेत, हे तपासण्याचे निर्देश आयुक्त लहाने यांनी बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुषंगाने शहर अभियंता इक्बाल खान यांनी कनिष्ठ अभियंत्यांची चमू तयार करून वृक्ष तपासणीला सुरुवात केली. वृक्ष तपासणीचा अहवाल तयार केला असता त्यामध्ये ५ हजार ५२ वृक्षांपैकी २ हजार ६६८ वृक्ष जिवंत असल्याचे समोर आले आहे. हा अहवाल आयुक्तांसमोर सादर केला जाणार आहे. शिक्षकांना दिले होते उद्दिष्टमनपा शाळेतील शिक्षकांना प्रत्येकी १० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी अनेक शाळांमधील वृक्षांचे योग्यरीत्या संगोपन झाल्याचे समोर आले. सदर वृक्षांमध्ये कडुलिंब, पिंपळ, वड, सप्तपर्णी आदींचा समावेश आहे. सहा हजार वृक्ष लावणार!महापालिकेच्यावतीने यंदा ६ हजार वृक्ष लावल्या जातील. शहरातील खुली मैदाने, शाळा-महाविद्यालये तसेच मोकळ््या शासकीय जागांना प्राधान्य दिले जाईल. वृक्षांचे संगोपन योग्यरीत्या झाल्यास निश्चितच शहराच्या पर्यावरणाला हातभार लागणार आहे.
‘जिओ टॅगिंग’ केलेल्या वृक्षांची तपासणी
By admin | Published: June 02, 2017 1:56 AM