अकोला: सातव्या फेरीअखेर, पुरुष गटात पुणे विद्यापीठाने उज्जैन विद्यापीठाचा धुव्वा उडवित ३-१ ने विजय संपादन केला. दुसऱ्या अटीतटीच्या पटावर जळगाव विद्यापीठाला मुंबई विद्यापीठाने साडेतीन-अर्ध्या गुणांनी पराजित करीत विजेते पदाच्या आशा जिवंत ठेवल्या. उद्याच्या अंतिम फेरीपूर्वी रोमांचक स्थितीत पोहोचलेल्या पुरुष गटात १४ गुणांसह पुणे विद्यापीठ आघाडीवर असून, १२ गुणांसह मुंबई विद्यापीठ द्वितीय स्थानावर आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेच्या सहाव्या फेरीअखेर सावित्रीबाई फुले विद्यापीठाने निर्णायक आघाडी घेतली असून, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व मुंबई विद्यापीठ संयुक्तरीत्या दुसºया स्थानावर आहेत. महिला गटातही सावित्रीबाई फुले विद्यापीठ आघाडीवर असून, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) तसेच राजस्थान विद्यापीठ संयुक्तरीत्या दुसºया क्रमांकावर आहेत.सातव्या फेरीदरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी स्पर्धेस भेट दिली. डॉ. भाले यांनी स्पर्धेच्या दर्जेदार नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करू न बुद्धिबळ जागतिक घडामोडींविषयी माहिती घेतली. पुढील वर्षी मोठ्या स्तरावर आयोजनाचा मानस व्यक्त करून, खेळाडूंची वैयक्तिक भेट घेत त्यांना प्रोत्साहन दिले.फोटो आहे