शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

बालश्री सन्मानासाठी वाशिमच्या चेतनची दावेदारी

By admin | Published: September 16, 2014 6:47 PM

वयाच्या सहाव्या वर्षापासून जन्मांध चेतनला समाजसेवेची गोडी

वाशिम : जिल्हा नेत्रदान प्रचार समितीचा ब्रँड अँम्बॅसिडर असलेल्या जन्मांध चेतन पांडुरंग उचितकरने राष्ट्रीय बालश्री सन्मान २0१४ साठी आपली दावेदारी सादर केली आहे. यासाठी ११ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडफेरीसाठी राज्यातून दाखल झालेल्या ९ ते १६ वयोगटातील सव्वाशे बालकांमध्ये अंधांच्या विशेष प्रवर्गात चेतन हा एकमेव स्पर्धक होता, हे विशेष.वाशिम तालुक्यातील केकतउमरा या गावचा रहिवासी असलेला चेतन जेमतेम १0 वर्षाचा आहे. वाशिमच्या सर्मथ विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या चेतनचे सामाजिक कार्य वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून सुरू झाले. विद्यार्थी आत्महत्या, नेत्रदान, कन्या भ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या, व्यसनमुक्ती आदी विषयांवर जनप्रबोधन करताना चेतनने महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये भ्रमंती केली असून, १६४ ठिकाणी त्याचे कार्यक्रम झाले आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये चेतनने बालवयातच केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन, राज्यभरात आजवर १२५ ठिकाणी त्याचे सत्कार करण्यात आले. लहान-मोठे जवळपास शंभर पुरस्कार मिळविणारा चेतन तबला व हार्मोनियम लिलया वाजवितो. वाशिम येथे १९ फेब्रुवारी २0१३ रोजी झालेल्या चाचा नेहरू बाल महोत्सवात चेतनला उत्कृष्ट बाल कलाकार म्हणून सन्मानीत करण्यात आले. शास्त्रीय संगीतातील ३२ राग प्रवीण कंठाळे या त्याच्यासारख्याच जन्मांध गुरूकडून त्याने अवगत केले. चेतन केवळ कलेपुरता र्मयादित राहिला नाही. भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी अभ्यास करू न शकणार्‍या मुलांना त्याने कार्यक्रमाच्या पैशातून आतापर्यंत ५0 हजार रुपये किमतीच्या सौर कंदिलांचे वाटप केले आहे. ग्रामीण भागातील मुलांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून केकतउमरा परिसरातील ५00 मुलांना साबण व नेलकटरचे वाटपही चेतनने केले आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून २५ अंध मुलांना रेडिओचे वाटप करण्याचे कामही चेतनने केले. बालश्री सन्मानाच्या माध्यमातून डोळसांचा अंधाप्रती असलेला दृष्टिकोन बदलविण्याची त्याची दृढ इच्छा आहे.