अकोला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरात १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवाजी पार्क परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, पुरुष व तरुण-तरुणी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. यासोबतच शहरात सामाजिक व धार्मिक संघटनांच्यावतीनेही चौका-चौकांमध्ये शिवरायांच्या प्रतिमा उभारून अभिवादन केले.सकाळी शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्यास शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हारार्पण करून अभिवादन केले. शिवाजी पार्क परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेत सहभागी शिवप्रेमी छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत होते. या जयघोषाने शहर दणाणून गेले होते. मंगळवारी शहरात जणूकाही शिवशाहीच अवतरली असल्याचा भास होत होता. सजविलेल्या आकर्षक रथात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी येसूबाई यांचे देखावे साकार करण्यात आले होते. रथ, अश्व, छत्र, चामर, ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रेमध्ये आमदार गोपीकिशन बाजोरिया, डॉ. अभय पाटील, विजय देशमुख, साजीद खान पठाण, नगरसेवक हरीश आलिमचंदानी, कृष्णा अंधारे, विनायक पवार, संदीप बाथो, सागर तिवारी, गोपीअण्णा चाकर, आनंद सुकळीकर, कैलास पवार, प्रदीप कांबळे, अशोक पटोकार, संदीप निर्मळ, जिजाऊ ब्रिगेडच्या पूनम पारसकर, डॉ. सीमा तायडे, इंदुमती देशमुख, डॉ. आम्रपाली आखरे, वृषाली गाढे, कविता शिंदे, नम्रता ठोकळ, पूनम कीर्तने, मीना कवडे, सविता शेळके, संध्या देशमुख, अनुपमा काकड यांची उपस्थिती होती. शोभायात्रा शिवाजी पार्क, अकोट स्टॅन्ड, अब्दुल हमीद चौक, टिळक रोड मार्गे मार्गक्रमण करीत शोभायात्रा डॉ. आंबेडकर खुले नाट्यगृह येथे पोहोचली. या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.शिवप्रेमींना सरबत वितरणछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाविद्यालयासमोर आयोजन समितीमधील नीरज बडगे, आकाश हिवराळे, विपुल सोनटक्के, आकाश हराळ, विशाल नंदागवळी, आशुतोष खंडारे, सागर इंगळे, प्रशांत तायडे, प्रताप अंभोरे, अतुल तायडे, साहित इंगळे, बालाराम धिमान, अमित लोंढे, विक्की गवळी, अंकुश गावंडे, शुभम कोहड, कृष्णा क्षीरसागर, रोहित गुप्ता व आदित्य बावनगडे यांनी शिवप्रेमींना सरबत वितरण केले.