लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टाबाजार : होळीच्या पर्वावर वाईट प्रवृत्तीची होळी करण्याची प्रथा आपल्याकडे रूढ आहे. विदर्भात कापूस पीक हे अत्यंत महत्त्वाचे व रोख पीक म्हणून मानले जाते; परंतु काही व्यापारी केवळ नफा मिळविण्याच्या आमिषाने शेतकºयांना कापसाचे बोगस बियाणे विकतात. या वाईट प्रवृत्तीचा निषेध म्हणून नजीकच्या किनखेड पूर्णा, टाकळी बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकºयांनी १ मार्च रोजी गावातील मुख्य चौकात नकली कापूस बियाण्यांच्या डमी पॉकेटची होळी केली.अकोट तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर कापूूस पिकाची लागवड केली जाते. अशावेळी शेतकºयांनी सरकार मान्यता असलेल्या कापूस पिकाच्या बियाण्यांची लागवड करणे महत्त्वाचे आहे. त्यांना बोगस बियाण्यांची विक्री करून भरमसाठ नफा कमाविण्याद्वारे शेतकºयांची फसवणूक करण्याच्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी होळीच्या पर्वावर किनखेड पूर्णा, टाकळी बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकºयांनी बोगस बियाण्यांच्या पॉकेटची होळी केली. या कार्यक्रमात शेतकºयांनी कापसाचे बियाणे विकत घेताना कंपनीचे निशान, पक्के बिल व बियाण्यांचे पाकीट सीलबंद असल्याची खात्री करावी, तसेच बियाणे परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले.या बोगस बियाण्यांची होळी करण्याच्या कार्यक्रमाला किनखेड पूर्णा येथील कृषी केंद्रचालक धनराज, सुभाष मुंदडा, कंपनीच्या प्रतिनिधीसह गावातील प्रगतीशील शेतकरी वसंत सावळे, राजेंद्र आर्र्इंंबे, निरंजन दामोधर, रामदास आर्इंबे, राजेंद्र लांडे, अंबादास गोंडचवर, गणेश इंगळे, पवन पतिंगे, सदाशिव गोंडचवर, ज्ञानेश्वर पतिंगे, प्रमोद इंगळे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
चोहोट्टाबाजार : शेतक-यांनी केली बोगस बियाण्यांची होळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 2:04 AM