अकोला : महावितरणच्याअकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांची त्रिपुरा येथील विद्युत मंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी निवड झाली आहे. त्यांना परिमंडळातून कार्यमुक्त केल्यानंतर सोमवारी विद्युत भवनातील प्रांगणात आयोजित भव्य कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना निरोप देण्यात आला.या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, प्रमुख अतिथी म्हणून अधीक्षक अभियंते विनोद बेथारिया, राहुल बोरीकर, गणेश पाचपोहे, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे व अॅड. अनंत खेळकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी सर्व संघटना, अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचा सन्मानचिन्ह, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगतामध्ये सर्वच वक्त्यांनी त्यांनी साडेचार महिन्यांमध्ये परिमंडळामध्ये केलेले कार्य व सेवेची माहिती दिली. यामध्ये वितरण पेट्यांची झाकणे लावण्याची मोहीम, स्वच्छता मोहीम, शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित, लिफ्ट सुविधा, केंद्रीय देयक प्रणाली कार्यशाळा, एच.व्ही.डी.एस. योजना निविदा प्रकियेमध्ये गतिमानता, खेळाडंूना प्रोत्साहन, परिमंडळाचे नाट्य प्रादेशिक स्पर्धेत प्रथम, ग्राहक जनमित्र व अधिकाºयांशी थेट संवाद अशा अनेक त्यांनी केलेल्या चांगल्या बाबींवर मान्यवरांनी मनोगतातून प्रकाश टाकला. सदर निवड ही महावितरणच्या कार्याचा गौरव असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. केळे यांनी अकोला परिमंडळामध्ये कमी अवधी मिळाला, तरी सर्वांच्या सहकार्याने अनेक कामांना गती देऊ शकलो, असे सांगितले. इतर राज्यांमध्ये सेवा करण्याची संधी ही महावितरणमुळे मिळत असून, ऊर्जा क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आता त्रिपुरा येथेसुद्धा शेवटच्या घटकापर्यंत उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी प्रयत्नरत राहू, अशी ग्वाही डॉ. मुरहरी केळे यांनी यावेळी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले. या समारंभाला महावितरणचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी, जनमित्र यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.