अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे होत असलेल्या खामगाव कृषी महोत्सव-२०१८ च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येथील विमानतळावर शनिवारी सकाळी आगमन झाले. याप्रसंगी अकोला विमानतळावर भाजपचे लोकप्रतिनिधी व इतर मान्यवरांकडून मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.शासकीय योजनांची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात चार दिवसीय पश्चिम विदभार्तील सर्वात मोठा कृषी महोत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांचे अकोला येथील विमानतळावर सकाळी ११ वाजता आगमनन झाले. यावेळी त्यांच्योसोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते. विमानतळावर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, उपमहापौर वैशाली शेळके, डॉ. अशोक ओळंबे पाटील, आशिष पवित्रकार यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:34 PM
अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे होत असलेल्या खामगाव कृषी महोत्सव-२०१८ च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येथील विमानतळावर शनिवारी सकाळी आगमन झाले.
ठळक मुद्दे विमानतळावर भाजपचे लोकप्रतिनिधी व इतर मान्यवरांकडून मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.