अकोला: लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे निकाल २३ मे रोजी समोर आल्यानंतर भाजपमध्ये सर्वत्र आनंदीआनंद आहे. निकालाच्या दुसºयाच दिवशी (शुक्रवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला दौºयात भाजपचे विजयी उमेदवार खासदार संजय धोत्रे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या दौºयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.लोकसभेच्या १७ व्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभरात दणदणीत विजय संपादित केला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे पक्षातील तसेच ‘एनडीए’तील घटक पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार खा. अॅड. संजय धोत्रे यांनी सलग चौथ्यांदा प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. २३ मे रोजी निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर दुसºयाच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला दौºयात खासदार अॅड. संजय धोत्रे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन गुफ्तगू केली. याप्रसंगी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ. सुनील देशमुख, विदर्भ वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती, ज्येष्ठ आ. गोवर्धन शर्मा, माजी संघटन सचिव रवी भुसारी, आ. डॉ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदिले, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील उपस्थित होते. ही केवळ सदिच्छा भेट असल्यामुळे कोणतीही राजकीय टिप्पणी करण्यास मुख्यमंत्र्यांनी नम्रपणे नकार दिला.