अकोला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, ३ जून रोजी अकोला दौर्यावर येत आहेत. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील तेल्हारा व घुसर येथील कामांची पाहणी ते करणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस अकोला दौर्यावर येत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयामार्फत सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाला दूरध्वनीद्वारे प्राप्त झाली. प्राप्त माहितीनुसार ३ जून रोजी सकाळी १0 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांचे अकोल्याच्या शिवणी विमानतळावर आगमन होणार असून, तेथून ते वाशिमकडे प्रयाण करतील. वाशिम येथून हेलीकॉप्टरने अकोला जिल्ह्यातील तेल्हारा आणि घुसर येथे भेट देऊन जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामांची पाहणी करणार आहेत.
*जिल्हाधिका-यांनी घेतली पूर्वतयारीची बैठक!
मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या पृष्ठभूमिवर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सोमवारी दुपारी संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन, पूर्वतयारीचे नियोजन केले.