शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

 राज्यातील पाणी-चारा टंचाई निवारणाचा मुख्य सचिव घेणार लेखाजोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 2:03 PM

अकोला: राज्यातील पाणी व चाराटंचाई निवारणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा लेखाजोखा राज्याचे मुख्य सचिव यूपीएस मदान घेणार आहेत.

- संतोष येलकर

अकोला: राज्यातील पाणी व चाराटंचाई निवारणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा लेखाजोखा राज्याचे मुख्य सचिव यूपीएस मदान घेणार आहेत. त्यासाठी ३ मे रोजी मुख्य सचिव संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.दुष्काळी परिस्थितीत राज्यातील विविध भागात पाणी आणि चारा टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असून, जनावरांसाठी पाणी आणि चाराटंचाईचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाणी आणि चारा टंचाई निवारणासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा ३ मे रोजी राज्याचे मुख्य सचिव यूपीएस मदान घेणार आहेत. या आढावा बैठकीला राज्यातील विभागीय आयुक्तांसह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या आढावा बैठकीत पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांसह टंचाई निवारणासाठी निधी मागणीचा आढावादेखील घेण्यात येणार आहे.पाणीपुरवठा योजनांच्या वीज देयकांची घेणार माहिती!सन २०१८-१९ मधील टंचाई कालावधीत गत आॅक्टोबर २०१८ पासून राज्यातील पाणीपुरवठा योजनांच्या चालू वीज देयकांची अदायगी यासंदर्भातही मुख्य सचिव आढावा बैठकीत माहिती घेणार आहेत.जिल्हानिहाय मागविली माहिती!राज्यातील पाणी व चाराटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्य सचिव घेणार असल्याने, संबंधित मुद्यांची जिल्हानिहाय माहिती शासनाच्या पाणीपुरवठा विभागासह विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत मागविण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत माहिती सादर करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारdroughtदुष्काळ