जिल्ह्यात १३०० बालकांना कोरोना
मागील वर्षभरात जिल्ह्यात ० ते १२ वर्ष वयोगटातील सुमारे १३०० बालकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे कोविडच्या दुसऱ्या लाटेत आढळल्याची माहिती आहे.
ही घ्या काळजी
कोरोनातून बरे झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांनंतर एमएसआयसी या आजाराची लक्षणे बालकांमध्ये दिसून येतात. अशा परिस्थितीत बालकांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
यापासून बचावासाठी लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ नये, अशी खबरदारी घेण्याची गरज आहे.
त्यासाठी पालकांनी लहान मुलांनाही मास्क, स्वच्छ हात धुणे, तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीची पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
कोरोनाचे एकूण रुग्ण - ५७४८९
कोरोनावर मात केलेले रुग्ण - ५५८८७
जिल्ह्यात एकूण कोरोनाचे मृत्यू - ११२२
उपचार घेत असलेले रुग्ण - ४८०
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ एकाच बालकाला या आजाराची लागण झाली होती. उपचारानंतर रुग्ण बरादेखील झाला आहे. हा आजार होऊ नये, यासाठी बालकांना कोरोना होऊच नये, अशी खबरदारी पालकांनी घ्यावी.
- डॉ. विनीत वरठे, बालरोगतज्ज्ञ, जीएमसी, अकोला