लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विश्वास करंडक बाल नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून विविध शाळांमधील चिमुकल्या कलावं तांनी सिद्ध करू न दाखविले, की ‘हम भी कुछ कम नही’. स्पर्धेत ३७ शाळांनी सहभाग घेतला आहे.७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत १८ शाळांनी विविध चाकोरीतील १८ नाटके सादर केलीत. यातील बहुतांश नाटकांमध्ये बाल कलावंतांनी अपेक्षेपेक्षा सुंदर भूमिका वठविल्या. प्रत्येक नाटकातून समाजास कोण तातरी मोलाचा संदेश देण्याचे काम बाल कलावंत करी त आहेत. स्पर्धेत जागेश्वर विद्यालय वाडेगाव यांचे ‘मी तुमची मुलगी बोलते’, कनुभाई वोरा अंध विद्यालय मलकापूर यांचे ‘मला पण बोलू द्या!’, जागृती विद्यालयाचे ‘घुसमट’, स्कूल ऑफ स्कॉलर्सचे ‘नो दि वर्ल्ड’, विवेकानंद विद्यालयाचे ‘एकच प्रेरणा महत्त्वाची’, लिटिल स्टारचे ‘बेटी बचाओ’ आणि सन्मित्र स्कूलचे ‘सोहनचे स्वप्न’ नाटकांचा समावेश आहे. ११ सप्टेंबर पर्यंत चालणार्या या स्पर्धेत आणखी १९ नाटके सादर होणार आहेत.
अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डोळस अभिनय कनुभाई वोरा अंध विद्यालय मलकापूर येथील अंध बालकांनी ‘मला पण बोलू द्या!’ नाटक सादर केले. डॉ. सुनील गजरे लिखित या बाल नाट्यात अश्विनी पाठे, अमित बहादुरे, शुभम वानखडे, सागर वाघमारे, रोहण बिलोणे, श्याम पवार या अंध विद्यार्थ्यांनी भूमिका सादर केल्या. अंध असूनही त्यांचा रंगमंचावरील सहज वावर डोळस कलावंतापेक्षाही सरस वाटला. विशेष म्हणजे यातील एकाही कलावंताला त्यांच्या डॉयलॉगचे प्रॉमटिंग करण्याची गरज भासली नाही. आज समाजात स्त्री-पुरुष समानतेच्या सुरस गप्पा मारण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात कुठेतरी पुरुषांना झुकते माप दिले जाते. या नाटकातील मिनलला मुख्याध्या िपकेच्या पदावर नियुक्ती दिली जाते. तिची ही नियुक्ती होताच शाळेतील इतर पुरुष शिक्षकांचा अभिमान, स्वाभिमान जागृत होतो. या नियुक्तीत भेदभाव झाल्याचा आरोप मिनलवर करण्यात येतो. शेवटी न्याय निवाड्यासाठी प्रकरण कोर्टात दाखल हो ते. येथे आरोपीच्या पिंजर्यात उभी असलेली मिनल कस्त्रया समाजात पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्याहीपेक्षा सरस कामे करीत आहेत. तरी त्यांच्या कार्यक्षमतेवर उगाच शंका का घेतल्या जाते, याबाबत न्यायमूर्तीसमोर आपले सडेतोड विचार व भावना मांडते. अखेर मिनलचा विजय होऊन नाटिका संपते. तीस मिनिटाच्या या नाटिकेत सर्वच कलावंतांनी नाटिकेस साजेसे असे हलके फुलके विनोद करू न प्रेक्षकांना रिझविले.