शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

अकोल्यातील बाजारपेठेतून ‘चायना’ मोबाइल हद्दपार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 10:30 AM

चिनी बनावटीच्या मोबाइलला ‘रेड सिग्नल’ दाखविल्यामुळे अकोल्यातील बाजारपेठेत मोबाइलचा तुटवडा निर्माण झाला आहे.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारत-चीनमध्ये गलवान घाटीत निर्माण झालेल्या वादाच्या पृष्ठभूमीवर केंद्र शासनाने चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या सुमारे ७ हजार कोटी रुपयांच्या चिनी बनावटीच्या मोबाइलला ‘रेड सिग्नल’ दाखविल्यामुळे अकोल्यातील बाजारपेठेत मोबाइलचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्राहकांमधून भारतीय बनावटीच्या मोबाइलची मागणी वाढली असून, तुटवड्यामुळे किमतीमध्ये चांगलीच वाढ झाल्याची माहिती आहे.संपूर्ण जगाला कोरोना विषाणूचा अभिशाप देणाºया चीनने गलवान घाटीत घुसखोरी केल्यामुळे भारतासोबतचे संबंध ताणल्या गेले आहेत.त्याचा परिणाम चीनमधून आयात केल्या जाणाºया विविध साहित्यावर व मालावर झाला आहे. केंद्र शासनानेसुद्धा एकूण ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यासोबतच चीनमधून आयात करण्यात आलेल्या व ‘कस्टम’ मध्ये अडकून पडलेल्या सुमारे सात हजार करोड रुपयांच्या चिनी बनावटीच्या मोबाइलच्या बाजारपेठेतील वितरणाची परवानगी नाकारली आहे.त्याचा परिणाम जिल्ह्यात मोबाइल क्षेत्रातील बाजारपेठेवरही झाल्याचे समोर आले आहे. बाजारपेठेत चिनी बनावटीच्या मोबाइलचा तुटवडा असल्यामुळे किमतीच्या दरातही सुमारे दोन हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात अठरा ते वीस कोटींची उलाढालमोबाइलद्वारे आॅनलाइन शिक्षण प्रणाली सुरू झाल्यामुळे मोबाइलच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यात मोबाइल क्षेत्रातील उलाढालीवर झाला असून, मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात अठरा ते वीस कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

ग्राहकांमधून भारतीय व इतर देशातील बनावटीच्या मोबाइलची मागणी वाढली आहे. लहान विद्यार्थ्यांसाठी टॅबची मागणी वाढली असली तरी पुरवठा कमी असल्यामुळे किमतीत वाढ झाली आहे. कमी किमतीच्या मोबाइलला ग्राहकांनी पसंती दिली आहे.- अरुण आलिमचंदानी, मोबाइल डिस्ट्रीब्यूटर.

आॅनलाइन शिक्षण प्रणालीमुळे मोबाइलच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली आहे. अचानक मागणी वाढल्याने मोबाइलचा तुटवडा निर्माण झाला असून किमती वाढल्या आहेत.- रितेश मिरजापुरे,मोबाइल व्यावसायिक, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाMobileमोबाइलchinaचीन