लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशाच्या फुटबॉल विश्वात ‘वॉल ऑफ चायना’ म्हणून ओळखले जाणारे सय्यद इब्राहिम अली सय्यद अजीज यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांचा दफनविधी गुरुवारी पार पडला.सय्यद इब्राहिम अकोला नगरपालिकेतून ऑफीस सुपरीडेन्टंट म्हणून सेवानवृत्त झाले होते. अकोल्यात नावाजलेल्या बाल पोलीस क्लबमधून त्यांनी फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर स्पोर्ट क्लब अकोलाकडून खेळत होते. कोलकाता येथे भारतातील नामवंत व प्रसिद्ध फुटबॉल संघाकडून ते खेळले. देशातील सवरेत्तम फुटबॉलपटूमध्ये त्यांची गणना होत होती. सय्यद इब्राहिम यांच्या खेळाचे वैशिष्ट्ये म्हणजे ते नेहमी प्रत्येक सामन्यात स्ट्रेट खेळायचे. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू अनेकदा पैज लावायचे, की त्यांना कट मारू न पुढे जायचे; परंतु एकाही खेळाडूंना त्यांना कट मारू न पुढे खेळण्याचे धाडस झाले नाही. अकोल्यातील आणखी एक फुटबॉलचे महारथी पप्पू पांडे. पप्पू पांडे आणि इब्राहिम अली यांची जोडी मैदानात उतरली, की समोरचा संघ दोघांना पाहूनच माघार घेत होता. केवळ या जोडीचा खेळ पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमी मैदानात गर्दी करीत होते.अकोल्यातील फुटबॉल महारथी देवीदास सज्रेकर, पंढरीनाथ गोपनारायण, अब्दुल रहेमान खान, मोहम्मद फारुख, गजानन शेलार, बबनराव पातोंड हे सर्व दिग्गज फुटबॉलपटू सय्यद इब्राहिम यांच्यासोबत एका संघात खेळले आहेत.
‘चायना वॉल’ कोसळली..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:40 AM
अकोला : देशाच्या फुटबॉल विश्वात ‘वॉल ऑफ चायना’ म्हणून ओळखले जाणारे सय्यद इब्राहिम अली सय्यद अजीज यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांचा दफनविधी गुरुवारी पार पडला.
ठळक मुद्देइब्राहिम अली काळाच्या पडद्याआडफुटबॉल विश्वात ‘वॉल ऑफ चायना’ म्हणून ओळख