अकोला : मकर संक्रांत आणि पतंग, मांजा हे एक समीकरणच बनले आहे; परंतु पतंगबाजीचा उत्सव निष्पाप जीवांवर बेतत आहे. शासनाने चायना मांजावर बंदी घातलेली असताना, सर्रास बाजारास चायना मांजाची विक्री होत आहे. या चायना मांजामुळे स्वत:च्या आणि इतरांच्या जीवावरसुद्धा संक्रांत येऊ शकते. त्यामुळे पतंग उडवताना खबरदारी घ्या आणि दोऱ्याचा वापर करा, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.शासनाने नायलॉनच्या घातक चायना मांजावर बंदी घातली असली तरी, बाजारामध्ये सर्रास चायना मांजाचे बंडल सहजरीत्या उपलब्ध होत आहे. या चायना मांजामुळे पक्षी तर जखमी होतातच, शिवाय लहान मुलांची बोटेसुद्धा कापली जातात. पतंग उडवताना, मांजा अनेकांच्या गळ्यात अडकल्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. अनेक दुचाकीस्वारांचा गतीमुळे क्षणात गळा कापल्या जाऊ शकतो. मांजामुळे चेहºयालासुद्धा इजा होऊ, त्वचा कापल्या जाते. अलीकडेच मांजाने गळा कापल्यामुळे एका लहान मुलाचा तर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नॉयलॉन मांजामध्ये धातूच्या भुकटीचा वापर केला जात असल्याने, मांजाचा विद्युत तारांना स्पर्श झाल्यास, त्यामुळे विजेचा झटका बसू शकतो. उत्सव साजरा जरूर करावा; परंतु उत्सवाला अनुचित घटनेचे गालबोट लागता कामा नये. याबाबत पालक व मुलांनीसुद्धा खबदारी घेतली पाहिजे. पालकांनी मुलांना चायना मांजासह इतर कोणताही घातक मांजा घेऊन देऊन नये. बºयाचदा इमारतीच्या छतावर पतंग उडवताना तोल जाऊन अनेक मुले जखमी, मृत्युमुखीसुद्धा पडली आहेत. त्यामुळे पालकांनी अंर्तमुख होऊन विचार करावा आणि आपल्या मुलांचा आणि इतरांचाही जीव वाचवावा.
युवक जखमीसिंधी कॅम्पमधील रहिवासी विकास नारायणदास टहलाणी हा युवक दुचाकीने एलआरटी कॉलेजसमोरून जात असताना त्याच्या गळ्याभोवती चायनीज मांजा अडकला. त्याने दुचाकी तातडीने थांबविली मात्र गळ्याला दुखापत होण्यापासून वाचले असले तरी विकास याच्या डोळ्याजवळ या मांजाने गंभीर दुखापत झाली.