सात महिन्यांत थोडी-फार घट
१) गेल्या तीन वर्षांची स्थिती पाहिली असता, २०१८ नंतर २०१९ मध्ये नोंदणी विवाहांची संख्या घटून ती ४७७ वर पोहोचली, तसेच २०२० मध्ये ही संख्या ४८५ वर पोहोचली.
२) त्यानंतर, २०२१ मध्ये जानेवारी महिन्यात ३४ विवाह झाले. नंतर ते कमी कमी होत जात जूनमध्ये २९ वर आले आहे. मे महिन्यात केवळ ९ विवाहांची नोंद झाली.
कधी किती झाले नोंदणी विवाह?
२०१८ - ५२७
२०१९ - ४७७
२०२० - ४८५
२०२१ जानेवारी - ३४
२०२१ फेब्रुवारी - ४६
२०२१ मार्च - ३९
२०२१ एप्रिल - ३०
२०२१ मे - ९
२०२१ जून - २९
कोरोनामुळे कंपनीने घरून काम करण्यास सांगितले. त्यात पगारातही कपात केली. त्यात महागाईही वाढली असून, अशा परिस्थितीत एकट्याचा खर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे उगाचच लग्न करून खर्चात वाढ करून घेण्यापेक्षा सध्या बॅचलर लाइफच बरे आहे.
- धम्मपाल इंगळे, तरुण
यंदा लग्न करण्याचा विचार होता. शासनाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती नोकरीही लागली होती, परंतु कोरोनामुळे अद्यापपर्यंत रुजू करून घेतले नाही. त्यामुळे लग्नही लांबणीवर टाकले.
- विजय पाटील, तरुण