अकोला : शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी खिश्चन धर्मियांचा पवित्र सण ‘गुड फ्रायडे’ साजरा करण्यात आला. शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये (चर्च) यावेळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त रविवारी ख्रिश्चन धर्मीय ‘ईस्टर संडे’ हा सण साजरा करणार आहेत.प्रभू येशू ख्रिस्तांनी अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी क्रुस खांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात ‘गुड फ्रायडे (उत्तम शुक्रवार) हा सण साजरा केला जातो. अकोल्यातही शुक्रवारी हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे ३० चर्चेसमधून प्रार्थनासभांचे सकाळी आणि दुपारी आयोजन करण्यात आले. खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये शुक्रवारी दुपारी १२ ते ३ या वेळात आयोजित प्रार्थनासभेमध्ये, प्रभू येशू ख्रिस्तांनी क्रुस खांबावर त्यांना खिळण्यात आले असता उच्चारलेल्या सात वाक्यांवर बायबलच्या अभ्यासकांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी संडे स्कुल, महिला संघ, तरुण संघाच्या सदस्यांनी ‘गुड फ्रायडे’वर आधारित गीते सादर केलीगेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र लेन्थ महिना सुरु होता. या चाळीस दिवसांच्या काळात ख्रिश्चन बंधू-भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात. घरोघरी कॉटेज प्रेअर्सचे आयोजन केले जाते. गुरुवारी मौंदी गुरुवारनिमित्त प्रार्थनासभा होते.‘गुड फ्रायडे’च्या दिवशी या उपवासांची सांगता होते. शहरातील सर्वच चर्चेसमध्ये ‘गुड फ्रायडे’ मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दरम्यान, उद्या अर्थात रविवारी प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त जगभरात ईस्टर संडे हा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी बेथेल सेव्हिअर्स चर्चच्या प्रांगणात शनिवारी रात्रीच एक माठे रिंगण तयार करण्यात येते. रविवारी पहाटे सहा वाजता अकोल्यातील सर्वच चर्चचे सदस्य तेथे उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी होतात. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या अकोल्यातील एकमेव खिश्चन कॉलनीमधून दिंडी काढण्यात येऊन ईस्टर संडेनिमित्त विविध गीते गायली जातात. रविवारी जस्टीन मेश्रामकर, राजेश ठाकूर, अजय वर्मा, अमित ठाकूर, चंद्र्रकांत ढिलपे, सरला मेश्रामकर, अरविंद बिरपॉल यांच्या नेतृत्वात ही दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला शहरात ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला ‘गुड फ्रायडे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 3:31 PM
अकोला : शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी खिश्चन धर्मियांचा पवित्र सण ‘गुड फ्रायडे’ साजरा करण्यात आला. शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये (चर्च) यावेळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देअकोल्यातही शुक्रवारी हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे ३० चर्चेसमधून प्रार्थनासभांचे सकाळी आणि दुपारी आयोजन करण्यात आले.याप्रसंगी संडे स्कुल, महिला संघ, तरुण संघाच्या सदस्यांनी ‘गुड फ्रायडे’वर आधारित गीते सादर केली