अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबारात महापालिका प्रशासनाकडून सर्वसामान्यांच्या तक्रारी, समस्या निकाली काढल्या जात नसल्याचा ऊहापोह नागरिक करतात. अशा नागरिकांच्या समस्या, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शुक्रवारी मुख्य सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला संपूर्ण शहरातून केवळ आठ तक्रारकर्त्या नागरिकांनी उपस्थिती दर्शविल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. यापैकी चार तक्रारी जनता दरबारातील होत्या, हे विशेष.सर्वसामान्यांच्या तक्रारी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील दर पंधरा दिवसांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करतात. प्रशासनाच्या लालफीतशाही कारभारात अनेक विश्वासार्ह तक्रारींना केराची टोपली दाखविली जात असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. प्रशासनाचे उंबरठे झिजविणाऱ्या अशा नागरिकांसाठी जनता दरबारामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. शहरात शेजाºयाने अतिरिक्त बांधकाम केल्यामुळे होणारा त्रास, सर्व्हिस लाइनमधील अतिक्रमण, रस्त्यांवरची अतिक्रमित बांधकामे, नाल्यांची समस्या आदी विविध तक्रारी मनपाच्या स्तरावर निकाली काढल्या जात नसल्याचा आक्षेप नोंदवत नागरिक जनता दरबारात कल्लोळ करतात. अशा विविध प्रकारच्या तक्रारी व नागरिकांना भेडसावणाºया समस्या निकाली काढण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शुक्रवारी मनपाच्या मुख्य सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी संपूर्ण शहरातून केवळ आठ तक्रारकर्त्यांनी मुख्य सभागृहात उपस्थिती लावली. यापैकी चार तक्रारकर्त्यांनी यापूर्वी जनता दरबारात हजेरी लावली होती. उपायुक्त सुमंत मोरे, सहायक आयुक्त पूनम कळंबे, नगर सचिव अनिल बिडवे यांच्यासह झोन अधिकारी, विभाग प्रमुखांनी तक्रारींचे निरसन केले.मनपाच्या आवाहनाकडे पाठएरव्ही महापालिका प्रशासन सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष क रते, असा पाढा वाचला जातो. जनता दरबारात काही विशिष्ट तक्रारकर्ते याचा चांगलाच ऊहापोह करतात. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींसमोर मोठा गहजब निर्माण करणाºयांनी मनपाच्या आवाहनाकडे पाठ फिरविल्याने तक्रारींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली आहे.