शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

‘आधार’च्या चुका दुरुस्तीसाठी केंद्राअभावी नागरिक निराधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:22 AM

अकोला : नागरिकांना आधार कार्डची डोकेदुखी कायम आहेच, ज्यांना मिळाले, त्यांचा मोबाइल क्रमांक अपडेट नाही, अनेकांचे बोटांचे ठसे जुळत नाहीत, पाच वर्ष वयोगटासोबतच नवजात बालकांच्या आधारची नोंद नाही. या समस्या निकाली काढण्यासाठी शासनाने आधार नोंदणी, दुरुस्तीची कायमस्वरूपी सोय करण्याचे ठरवले असताना अकोला शहर आणि जिल्ह्यात आवश्यक १३0 किटसपैकी एकही नव्याने मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यातच सुरू असलेल्या ४९ पैकी दोन केंद्रात नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात रक्कम उकळल्याने ती काळ्य़ा यादीत टाकण्याची कारवाई करण्यात

ठळक मुद्देजिल्ह्यात केंद्र वाढवण्याची तयारीच नाही : दोन केंद्र काळ्य़ा यादीत

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागरिकांना आधार कार्डची डोकेदुखी कायम आहेच, ज्यांना मिळाले, त्यांचा मोबाइल क्रमांक अपडेट नाही, अनेकांचे बोटांचे ठसे जुळत नाहीत, पाच वर्ष वयोगटासोबतच नवजात बालकांच्या आधारची नोंद नाही. या समस्या निकाली काढण्यासाठी शासनाने आधार नोंदणी, दुरुस्तीची कायमस्वरूपी सोय करण्याचे ठरवले असताना अकोला शहर आणि जिल्ह्यात आवश्यक १३0 किटसपैकी एकही नव्याने मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यातच सुरू असलेल्या ४९ पैकी दोन केंद्रात नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात रक्कम उकळल्याने ती काळ्य़ा यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे.शासनाच्या विविध योजनांचा लाभ देताना थेट हस्तांतरण पद्धत राबवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी लाभार्थींकडे आधार क्रमांक, त्यासोबत मोबाइल क्रमांक संलग्नित असणे आवश्यक करण्यात आले. मात्र, ही पद्धत राबवताना सर्वाधिक अडचण आधार क्रमांकांशी मोबाइल क्रमांक संलग्नित नसणे, आधारमध्ये नोंदणी केलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी बोटांचे ठसे न जुळण्याचे हजारो प्रकार कर्जमाफीचे अर्ज दाखल करताना उघडकीस आले. त्यातच शालेय विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती खात्यात जमा करण्यातही प्रचंड अडचणी निर्माण झाल्या. या सगळ्य़ा प्रकारांच्या तक्रारी राज्यातील सर्वच जिल्हाधिकार्‍यांकडे झाल्या. त्याचवेळी आधार कार्डची नव्याने नोंदणी करणे, आधीच्या क्रमांकातील माहिती जुळत नसल्याने ती अद्ययावत करण्याची सोय कुठेच नव्हती. शासनाच्या कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन करताना या अडचणींचा सर्वाधिक सामना शेतकर्‍यांसह त्यांच्या कुटुंबीयांना करावा लागला. जिल्हाधिकारी कार्यालयात काही प्रमाणात आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणासाठी केंद्रं सुरू झाली. मात्र, समस्या सुटणार नाही, हे लक्षात घेता आधार नोंदणी केंद्र कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची वेळ शासनावर आली. त्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक महसूल मंडळाच्या गावात एक केंद्र, तर महापालिका क्षेत्रात २५ हजार लोकसंख्येच्या क्षेत्रासाठी एक केंद्र निर्मिती करण्याचे नियोजन शासनाने सप्टेंबर २0१७ मध्येच केले. त्यासाठी अकोला जिल्ह्यात कायमस्वरूपी नोंदणी केंद्राचे १३0 प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यासाठी किटसचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यात एकही किट प्राप्त झाली नाही. त्यामुळे आधारची नव्याने नोंदणी, माहितीमध्ये दुरुस्तीची गरज असलेले नागरिक आधारसाठी सध्यातरी निराधार असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. 

अनेक केंद्रांमध्ये आधार नोंदणीसाठी लूटसद्यस्थितीत जिल्ह्यातील ५१ पैकी ४९ महसूल मंडळाच्या गावात आधार नोंदणी केंद्र आहे. त्यापैकी अनेक केंद्रामध्ये नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात रक्कम उकळली जाते. हा प्रकार तक्रारीतून उघड झाल्याने जिल्ह्यातील दोन केंद्र काळ्य़ा यादीत टाकत बंदची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये कापसी, अकोल्यातील वाशिम बायपास परिसरातील केंद्राचा समावेश आहे. शहरात तीनच केंद्रात सध्या आधारची सोय आहे. त्यापैकी एका केंद्रात नागरिकांची आर्थिक लूट करण्याचा प्रकार घडत आहे. 

 

टॅग्स :Akola cityअकोला शहर