मूर्तिजापूर शहरात फेब्रुवारी महिन्यापासून लसीकरण मोहीम सुरू आहे. सुरुवातीला फ्रंन्टलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर, ४५ ते ६० वयोगटांतील दुर्धर आजारग्रस्त व ६० वर्षांवरील वयोवृद्धांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. सद्यस्थितीत १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येत आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोससाठी २८ दिवसांचा कालावधी होता. त्यानंतर, कोव्हॅक्सिन लसीकरण करण्यात आले. यात दुसरा डोस २८ ते ४५ दिवस करण्यात आला. नंतर पुन्हा यामध्ये बदल करून दुसरा डोससाठी ४५ ते ६० दिवस करण्यात आला, आता नवीन मार्गदर्शन तत्त्वानुसार कोविशिल्डचा दुसरा डोस ८४ दिवसांनंतर करण्यात आला असल्याने, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दुसऱ्या डोससाठी कालावधी निश्चित नसल्याने नागरिक संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:18 AM