मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
--------------------------------------------
शेतकरी नवीन वीज जोडणीपासून वंचित !
पातूर : नवीन कृषिपंपांना वीजखांबापासून सर्व्हिस वायरद्वारे ३० मीटरपर्यंत एका महिन्यात, तर २०० मीटरपर्यंत एरियल, लघु दाब वीज वाहिनीद्वारे तीन महिन्यात देण्याचे जाहीर करण्यात आले होते ; मात्र शेतकरी नवीन वीज जोडणीपासून वंचित आहे.
-----------------------------------------
रेती मिळत नसल्याने सर्वसामान्य हैराण
बाळापूर : तालुक्यात रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहे. तालुक्यात सध्या रेतीअभावी नव्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात गदा आली आहे. बांधकाम करायचे कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. व्यावसायिकांना ही रेतीघाट लिलावांची प्रतीक्षा लागली आहे.
---------------------------
पाणीपातळी खोल, तरीही बोअरचा सपाटा !
बाळापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी बोअर करणाऱ्या रिंग माउंटेड मशीनवर बंदी घातली असताना त्या मशीन येऊन बोअर करून जातात. तालुक्यात कोरोना वेगाने फैलावत असताना अधिकारी व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन काही दलाल अधिक रक्कम घेऊन अवैध बोअर करून देत आहेत. काही भागात भर दिवसा बोअर केली जात आहेत.
------------------------------------------------------
कंचनपूर-बादलापूर मार्ग खड्डेमय
हातरूण : येथून जवळच असलेला कंचनपूर-बादलापूर मार्ग वर्दळीचा आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
------------------------------------
ग्रामीण भागात संचारबंदीचा बोजवारा !
बार्शीटाकळी : ग्रामीण विभागात प्रशासन पोहोचत नसल्यामुळे स्थानिक प्रशासनाला नागरिकांनी हूल दिल्याचे चित्र येथे दिसत आहे. काम नसताना व्यर्थ घराबाहेर पडणे, मास्क न घालणे, १४४ जमावबंदी कलम लागू असूनही अनावश्यक गर्दी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, असले प्रकार येथे रोजच पहायला मिळत आहे.
-------------------------------------------
कोरोना लॉकडाऊनमुळे लग्न प्रसंगावर मर्यादा
तेल्हारा : राज्यात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी जाहीर झाल्याने सर्व लग्न सोहळ्यात अडचणी आल्या आहेत. ग्रामीणमध्ये काही ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. केवळ २५ जणांनाच परवानगी व त्यात २ तासात लग्न आटपणे बंधनकारक असल्याने अनेक लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.
----------------------------------------------
वादळ वाऱ्याने आंबा पिकाचे नुकसान
माझोड : शनिवार व रविवारी काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात झाडावरील कैऱ्यांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी रात्रीच्या सुमारास ग्रामीण भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटला होता.
----------------------------------------------
नेटवर्क अभावी नागरिक झाले त्रस्त
पिंजर : विविध शासकीय कार्यालयातील कामकाजासह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाईन सुरू झाली आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे ; मात्र आता पिंजर परिसरातील निहिदा, पिंजर, महान आदी भागातील नागरिक नेटवर्क अभावी त्रस्त झाले आहेत.
-------------------------------------------
‘त्या’ योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा
अकोट : आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान योजनेचा हप्ता जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपये तीन टप्प्यात दिले जात आहे.
-------------------------------------
गावागावातील हातपंप नादुरुस्त
बाळापूर : गावागावात असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहेत ; मात्र ते नादुरुस्त असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
-------------------------------------------