मागील काही दिवसांपासून महापालिका क्षेत्रात माेकाट श्वानांच्या संख्येत माेठी वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. अशा श्वानांचा बंदाेबस्त करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची असून, काेंडवाडा विभागाकडून हाेणारा कानाडाेळा अकाेलेकरांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत आहे. घरासमाेर अंगणात खेळणारी लहान मुले, पहाटे माॅर्निंग वाॅकसाठी घराबाहेर निघणाऱ्या महिला, पुरुषांसाठी व रात्री घरी परतणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी भटके श्वान डाेकेदुखी ठरू लागली आहेत. हीच परिस्थिती संपूर्ण जिल्हाभरात असून, माेकाट श्वानांमुळे नागरिकांचा जीव धाेक्यात सापडल्याचे चित्र दिसून येते. मागील ११ महिन्यांच्या कालावधीत मनपा क्षेत्रात तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात श्वान दंश झालेल्या १२०४ जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले.
शहरात या भागात त्रास
उघड्यावर मांस विक्री केल्या जाणाऱ्या ठिकाणी माेकाट कुत्र्यांच्या झुंडी रस्त्याच्या मधाेमध ठिय्या मांडून बसतात. यामध्ये जुने शहरातील भांडपूरा चाैक, वाशिम बायपास चाैक, उमरीतील रेल्वे पूलाखाली, माेहम्मद अली चाैक, बाळापूर नाका राेड, मनपा कार्र्यलयामागे, सिंधी कॅम्प राेड, मलकापूर चाैक, अकाेटफैल पाेलीस स्टेशन समाेर आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे.
कुत्र्यांचे निर्बिजीकरण ठप्प
शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्थानिक महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठासाेबत संपर्क साधून त्याठिकाणी निर्बिजीकरणाला सुरूवात केली. लहाने यांची बदली हाेताच ही प्रक्रिया ठप्प पडल्याची माहिती आहे.
काेंडवाडा विभाग वाऱ्यावर
माेकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांना पकडण्याची जबाबदारी मनपाच्या काेंडवाडा विभागाची आहे. आयुक्तांनी निर्देश दिल्यानंतरच या विभागाकडून कुत्र्यांना पकडण्याची थातूर मातूर कारवाइ केली जाते. असे कुत्रे काटेपूर्णा वनपरिक्षेत्रात साेडले जातात.
भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे निर्देश काेंडवाडा विभागाला दिले आहेत. त्यांच्याकडून दरराेज किती कुत्रे पकडण्यात आले, याचा लवकरच आढावा घेतला जाइल.
-संजय कापडणीस आयुक्त मनपा
उघड्यावर मांस विक्रीच्या ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी ठाण मांडून बसतात. दुचाकीस्वारांचा पाठलाग करून त्यांना चावा घेतात. मनपाने कुत्रे पकडण्याची माेहिम रात्री सुरु करावी.
- प्रवीण शिंदे नागरिक
माेकाट कुत्र्यांमुळे
०००
बळी
१२०४
जखमी