लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अश्वांवर स्वार झालेले भीमसैनिक, निळय़ा रंगाचे फेटे परिधान केलेले युवक, हातामध्ये पंचशील ध्वज आणि ढोल-ताशांचा निनाद, ‘जय भीम’चा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रविवारी दुपारी शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. रेल्वे स्टेशन चौक परिसरातून रविवारी दुपारी धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या प्रारंभी अश्वांवर स्वार झालेले समता सैनिक दलाचे सदस्य होते. पंचशील ध्वज हातात घेऊन ‘जय भीम’च्या घोषासह मिरवणूक पुढे निघाली. अकोला : जिल्हाभरातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेले युवक, युवती, महिला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून बहुसंख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आखाडा व व्यायाम शाळेचे सदस्य लाठीकाठी, चक्र, तलवारबाजी, मलखांबसारखे चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर करीत होते. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी रस् त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. युवक-युवती हातात लेजीम घेऊन मिरवणुकीसमोर नृत्याचा फेर धरीत होत्या. हातात निळे ध्वज घेऊन भीमसैनिक पुढे सरकत होते. रेल्वे स् थानक, शिवाजी पार्क, होमिओपॅथी महाविद्यालय चौक, मनकर्णा प्लॉट चौक, शहीद अब्दुल हमीद चौक, रिगल टॉकिज मार्गावर ठिकठिकाणी भीमसैनिकांच्या स्वागतासाठी स्टॉल उभारण्यात आले होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीमसैनिकांना सामाजिक व राजकीय संघटनांच्यावतीने मसाला भात, पोहे, पुरी-भाजीचे वि तरण करण्यात आले. मिरवणूक मार्गावरील चौका-चौकांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आणि पुतळे उभारण्यात आले होते. या दोन्ही महामानवांच्या प्रतिमा, पुतळय़ांसमोर आकर्षक सजावट करण्यात आली होती. मिरवणूक उदय टॉकिजजवळ पोहोचल्यावर सायंकाळी भारिप- बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर, जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, आमदार हरिदास भदे, भारिप-बमसंचे कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, मनोहर पंजवाणी, जि.प. उपाध्यक्ष जमीर-उल्लाखाँ पठाण आदी नेते सजविलेल्या रथावर विराजमान झाले. या ठिकाणाहून मिरवणूक अकोला क्रिकेट क्लब मैदानावर पोहोचली.
चोख पोलीस बंदोबस्तधम्मचक्र प्रवर्तन दिन, मुस्लीम बांधवांचा मोहरम या उ त्सवानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या पोलीस बंदोबस्तामुळे दोन्ही धार्मिक उत्सव शांततेत पार पडले. यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उप-अधीक्षक उमेश माने पाटील, आर्थिक गुन्हे शाखा प्रमुख गणेश अणे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे, वाहतूक शाखा प्रमुख विलास पाटील, सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, रामदास पेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ, सिव्हिल लाइन्सचे अन्वर शेख, जुने शहरचे विनोद ठाकरे, डाबकी रोडचे सुनील सोळंके, एमआयडीसीचे किशोर शेळके, अकोट फैलचे तिरुपती राणे यांच्यासह मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.
राऊत यांची रुग्णसेवा..दुर्गा चौकातील डॉ. धर्मेंद्र राऊत यांच्यावतीने १३ वर्षांपासून क्रिकेट क्लब मैदानावर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळय़ासाठी ग्रामीण भागातून येणार्या आंबेडकरी जनतेसाठी आरोग्य सेवा उ पलब्ध करून देण्यात आली होती. डॉ. धर्मेंद्र राऊत यांनी शेकडो महिला, पुरुषांची मोफत तपासणी केली आणि त्यांना नि:शुल्क औषध वाटप केले. डॉ. राऊत यांनी गोरगरीब रुग्णांसाठी ६0 हजार रुपयांची औषधी उपलब्ध करून दिली होती. डॉ. वैशाली राऊत यांनीसुद्धा शेकडो महिला रुग्णांची तपासणी केली. याठिकाणी डॉ. राऊत यांनी रुग्णसेवेसाठी सकाळपासून स्टॉल उभारला होता. सकाळपासूनच खेड्यापाड्यातून आलेल्या रुग्णांनी स्टॉलवर गर्दी केली होती.
कॅनरा बँक, रोटरी क्लबतर्फे रुग्णांची तपासणीअकोला क्रिकेट क्लब मैदानावरील आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळय़ात सहभागी होण्यासाठी येणार्या नागरिकांची कॅनरा बँके तसेच रोटरी क्लब ऑफ नॉर्थच्यावतीने रुग्णांसाठी नेत्र त पासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. जुगल चिराणिया व त्यांच्या चमूने शिबिरात शेकडो रुग्णांची त पासणी केली.
बसस्टँड चौकात प्रतिदीक्षाभूमीचा देखावाबसस्टँडसमोरील हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकामध्ये आंबेडकरनगरातील भीमशक्ती तरुण मंडळातर्फे नागपूर येथील दीक्षाभूमीचा देखावा साकारण्यात आला. या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळासुद्धा उभारण्यात आला. येथून जाणार्या प्रत्येकाचे हा देखावा लक्ष वेधून घेत हो ता.
मिरवणूक मार्गावरील स्वच्छतेकडे लक्ष मिरवणुक मार्गावरील कचरा उचलण्यासाठी भारिप-बमसंच्याव तीने युवा कार्यकर्ते पराग गवई, रवी पाटील, प्रशांत जंजाळ, रामदास तायडे, नितीन डोंगरे, सुबोध पाटील, अनिल डोंगरे, राहुल इंगळे, शिवराज भिसे, धीरज आठवले, सुभाष हेरोले, मोहन डोंगरे, रतन उमाळे, राजू गोपनारायण, अंकित गो पनारायण, विशाल गोपनारायण यांनी आणि ‘आम्ही सारी भीमाची पोरं’ या ग्रुपने पुढाकार घेतला होता.
मैदानावरही स्वच्छता बॉक्सची व्यवस्थाअकोला क्रिकेट क्लब मैदानावर ठिकठिकाणी स्वच्छता बॉ क्सची व्यवस्था करण्यात आली होती. मैदानावर कचरा निर्माण होऊ नये. या दृष्टिकोनातून भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकार्यांनी पुरेपूर काळजी घेतली.
न्यू भीमगर्जना मंडळातर्फे चित्तथरारक प्रात्यक्षिकेयेथील कवाडेनगरातील न्यू भीमगर्जना बहूद्देशीय व क्रीडा मंडळाच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीत रविवारी दु पारी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मंडळातील महिला, युवती व युवकांनी लाठीकाठी, भोवराचक्र, अग्निचक्र यासह अनेक शारीरिक कसरती सादर केल्या. या कसरतींनी मिरवणुकीत सहभागी नागरिकांचे लक्ष वेधले होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित मिरवणुकीमध्ये म्हैसपूर येथील सत्यशील संघ व्यायाम शाळा, उमरा येथील जय बजरंग व्यायाम शाळा, शिवापूर येथील समता सैनिक व्यायाम शाळा, म्हैसपूर येथील भीमराज मंडळ आदी सहभागी झाले होते. या व्यायाम शाळेचे कार्यकर्ते लेजीम हातावर घेऊन ढोल-ताशांच्या तालावर थिरकत होते. सत्यशील संघ व्यायाम शाळेच्या महिला व युवतींनी लाठीकाठी, अग्निचक्राचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. न्यू भीमगर्जना मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी विविध शारीरिक प्रात्यक्षिक सादर करून मिरवणुकीतील सहभागी नागरिकांचे लक्ष वेधले. एवढेच नाही, तर सत्यशील संघाच्या चिमुकल्या कार्यकर्त्यांनीही लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.