शहरातील प्रत्येक राेडवर बेशिस्त ऑटाेचालकांचा हैदाेस हाेत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे़ ऑटाेचालक प्रवासी दिसले की पाठीमागील दुचाकीचा विचार न करता कुठेही ऑटाे थांबवतात. त्यामुळे अपघात हाेत असून अशा ऑटाेचालकांना शिस्त लावण्याची मागणी हाेत आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेने ऑटाेचालकांची बैठक घेऊन त्यांना वारंवार सूचनाही केल्या आहेत़ मात्र कायमस्वरूपी ताेडगा निघत नसल्याने ऑटाेचालकांना शिस्त लावण्याची मागणी अकाेलेकरांकडून हाेत आहे़
उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करा
उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने दरराेज किरकाेळ अपघात घडत असून शनिवारी एका दुचाकीचालकाचा याच कामातील साहित्य व इतर वाहतुकीच्या काेंडीमुळे मृत्यू झाला़ त्यामुळे उड्डाणपुलाचे काम सध्या अकाेलेकरांच्या जिवावर उठले असून हे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी हाेत आहे़
वाहतूक पाेलिसांची गैरसाेय
वाहतूक पाेलिसांना पावसापासून संरक्षण म्हणूण पक्की चाैकी शहरातील एकाही चाैकात नसल्याचे वास्तव आहे़ त्यामुळे वाहतूक पाेलिसांची गैरसाेय हाेत आहे़ पाेलिसांना रेनकाेटचे वाटप करण्यात आले आहे, तर काही चाैकातील पाेलिसांना उड्डाणपुलाच्या बांधकामाचा आधार मिळत आहे़
बीपीचे औषध स्वस्त करावे
ब्लड शुगरसाठी प्रत्येक रुग्णाला लागणारे औषध २०० ते ३०० रुपयांच्या दरम्यान हाेत हाेते़ मात्र आता ही औषधे तब्बल ५०० रुपयांच्यावर हाेत असल्याने ब्लड प्रेशरच्या रुग्णांचे हाल हाेत आहेत. त्यामुळे बीपीचे औषध स्वस्त करावे अशी मागणी हाेत आहे़ काही औषधी नियंत्रणाबाहेर काढल्याने या औषधांचे दर वाढल्याची माहिती आहे़
आरटीओ कार्यालयाची गर्दी राेडवर
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार भाड्याच्या इमारतीतून सुरू असून मंगरुळपीर राेडवर या ठिकाणी येणाऱ्या वाहनचालकांची माेठी गर्दी हाेत आहे. त्यामुळे या कार्यालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करून हे कार्यालय कायमस्वरूपी हलविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.