लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : मैत्री बहूद्देशीय संस्था मूर्तिजापूरद्वारे आयोजित नगराध्यक्ष चषक हाफ मॅरेथॉन स्पर्धा २0१८ मध्ये नाशिकच्या सुरेश हिरामन वाघ याने प्रथम क्रमांक पटकावला. वाशिमचा प्रकाश नानासाहेब देशमुख याने दुसरा क्रमांक पटकावला, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक गणेश नंदाजी डोईफोडे (शिंदखेड राजा) व संतोष महादेव चव्हाण (पिंपळोद) यांना विभागून देण्यात आले. खा. संजय धोत्रे यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेस सुरुवात केली. यावेळी आमदार हरीश पिंपळे, भाजप जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण मोरखडे, नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे, भाजयुमोचे प्रदेश सचिव गिरीष गोखले, नगरसेवक सचिन देशमुख, सरिता राहुल पाटील, राहुल पाटील, शिवसेना शहर प्रमुख विनायक गुल्हाणे, डॉ. शर्मा, निजामभाई इंजिनिअर, गुलाब दुबे, रावसाहेब कांबे, न. प. मुख्याधिकारी दादाराव डोलारकर, ठाणेदार प्रदीप देशमुख आदींची उपस्थिती होती.आई मंगल कार्यालयात बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खा. संजय धोत्रे यांचा आ. हरीश पिंपळे तसेच मैत्री बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, कोषाध्यक्ष गौरव देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तर खा. संजय धोत्रे व आ. हरीश पिंपळे यांच्या हस्ते सरिता पाटील, गिरीष गोखले, रोशन इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी खा. धोत्रे व आ. पिंपळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्पर्धेत सहभागी होणारे ६६ वर्षीय मनोहर ताकतोडे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवृत्ती खोकले यांनी, संचालन दिलीप देशमुख यांनी, तर आभार नगराध्यक्ष मोनाली गावंडे यांनी मानले.
विदर्भातील खेळाडू झाले सहभागी अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, नाशिक, बुलडाणा आदी जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. दरम्यान, मूर्तिजापूर शहर पोलिसांनी चोख वाहतूक व्यवस्था सांभाळून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. स्पर्धेसाठी कमलाकर गावंडे, निजाम इंजिनिअर, सचिन देशमुख, राहुल पाटील, प्रवीण लोकरे, आनंद महाजन, संतोष खोलगडे, राजू सदार, प्रवीण गुल्हाने, गोपाल भटकर, सचिन चांडक, अशोक धंदुकिया, त्रिलोक पचारिया, महेंद्र टाक यांनी सहयोग दिला, तर स्पर्धा यशस्वितेसाठी गौरव देशमुख, शैलेश करडे, श्रीकांत मेश्राम, रवींद्र थोरात, नवृत्ती खोकले,भूषण इंगळे, गणेश पाडेन, सचिन भारती, हेमंत मेहता, पवन शेरेकर, शुभम धर्माळे, कमलेश दज्जुका, आनंद बांगड, मंगेश जायले, सुभाष शेगावकर, राम खंडारे, गौरव बांगड, कमल कुर्मी, नितीन भटकर, भूषण परवडकर, क्षितिज देशमुख, सागर लोकरे आदींनी परिश्रम घेतले.