अकोला, दि. १५- सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यालगत असलेल्या धाबेकर सभागृहासमोरील एका कचर्याच्या ढिगाला बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे मनपा अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळावर धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यालगतच्या तारेच्या कुंपणाजवळ एक वेडसर महिला अनेक वर्षांंंपासून राहते. या महिलेने अनेक वर्षांंंपासून विविध प्रकारचा कचरा, प्लास्टिक, काचेच्या बाटल्यांसह काडीकचरा, कागद जमा करून ठेवले होते. या ठिकाणी मोठा ढीग साचला होता. बुधवारी सायंकाळी अचानक कचर्याने पेट घेतला. यावेळी कचर्याच्या ढिगार्याजवळ ही महिला झोपलेली होती; परंतु सिव्हिल लाइन पोलिसांनी प्रसंगावधान राखून महिलेला बाहेर काढले. तोपर्यंंंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. कचर्याने चांगलाच पेट घेतल्याने, रस्त्यावरून जाणारे वाहनचालक व नागरिकांनी मोठी गर्दी केली. वार्यामुळे तर कचर्याने आणखीच पेट घेतला. आगीच्या ज्वालांच्या झळा पोलीस ठाण्यापर्यंंंत येऊन पोहोचल्या. पोलीस कर्मचार्यांनीसुद्धा पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु रौद्ररूप धारण केलेली आग आटोक्यात येत नव्हती. हे लक्षात येताच पोलिसांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण केले. अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी पाण्याचे तीन बंब रिचवून आग नियंत्रणात आणली. आगीमुळे परिसरातील काही झाडे जळून खाक झाली.
सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यालगत आग
By admin | Published: March 16, 2017 2:39 AM