अकोला: शासनाने भारतीय राज्यघटनेत उल्लेख असतानाही राज्यातील कोट्यवधी भूमिहीन, झोपडपट्टीवासीयांना जमिनीचा हक्क देण्यासंदर्भात कायदा केला नाही. भूमिहीन व झोपडपट्टीवासीयांना जमिनीचा हक्क मिळाला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा समाज क्रांती आघाडीने भूमिहीन, झोपड पट्टीवासीयांच्या राज्यव्यापी हक्क परिषदेत दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे होते. प्रमुख अतिथी म्हणून सक्रांआचे नेते गुरुदास कांबळे, डॉ. गोपाल उपाध्ये, डॉ. मिलिंद नाखले, डॉ. सारंगधर तेलगोटे, प्रा. संदीप भोवते, विनोद इंगळे, अमर नगराळे, सागर बोरकर आदींची उपस्थिती होती. प्रा. मुकुंद खैरे म्हणाले की, सत्तेत येणारे पक्ष आमच्या हक्काबद्दल बोलण्यास तयार नसेल तर मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल. त्यामुळे सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणार्या प्रत्येक पक्षाला आमच्या हक्काची दखल घ्यावी लागेल. सरकार श्रीमंत कारखानदारांना जमीन देण्याकरिता सेझचा कायदा बनविते. मौल्यवान जमीन अल्पदरात दिली जाते, असे खैरे यांनी सांगितले.
भूमिहिनांना हक्क द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार
By admin | Published: September 15, 2014 1:55 AM