लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन वाडेगावातील सौफी चौकात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ८ जुलै रोजी घडली. तलवार व पाइपने हल्ला केल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी शेख राजू शेख रज्जाक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरुद्ध बाळापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
दोन गटात हाणामारी
By admin | Published: July 09, 2017 9:30 AM