लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अमरावती परीक्षा मंडळांतर्गत इयत्ता दहावीच्या परीक्षेला ४ मार्चपासून सुरुवात होणार आहे. दहावीचीपरीक्षा करिअरचा टर्निंग पॉइंट असल्याने विद्यार्थी, पालक परीक्षेला घेऊन अत्यंत गंभीर आहेत. यंदाच्या दहावी परीक्षेसाठी ११९ परीक्षा केंद्रे आहेत. जिल्ह्यातून एकूण ३0 हजार ७८५ विद्यार्थी बसणार आहेत. मंगळवारी दहावीचा पेपर आहे.दहावी परीक्षेच्या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले असून, परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानावर भर देण्यात येणार आहे. कॉपीसारखा गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनखाली महसूल विभागाचे दक्षता पथक नियुक्त केले आहे. यासोबच शिक्षणाधिकारी, माध्यमिक व प्राथमिक, उपशिक्षणाधिकारी, डायट प्राचार्यांचे पथक, महिला भरारी पथक अशी एकूण सात भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. यासोबतच व्हिडिओ शुटिंग पथकसुद्धा राहणार आहे. अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांचे विशेष लक्ष राहणार आहे. यंदा दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून १६ हजार ९१0 मुले आणि १३ हजार ८७५ मुली परीक्षा देणार आहेत.
SSC Exam : आजपासून दहावीची परीक्षा; १९९ परीक्षा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 11:04 AM