गतवर्षी डिसेंबर महिन्यात याच ठिकाणी शेख गुरुजींच्या मार्गदर्शनात बालसुसंस्कार शिबिर घेण्यात आले होते. त्याच विद्यार्थ्यांना आता शास्त्रीय संगीताचे धडे देण्यात येत आहेत. सुमारे २५ विद्यार्थी हार्मोनियमचे शिक्षण घेत असून २५ विद्यार्थी तबलावादन शिकत आहेत. सोबतच त्यांना गायनाचे अलंकारही शिकविले जात आहेत. विशेष बाब म्हणजे या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत दिले जात आहे. मोरगाव काकड येथे सुरू असलेल्या संगीत वर्गाला नुकतीच श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी तालुका प्रचारप्रमुख देविदास कावरे, प्रसिद्धिप्रमुख जेठाभाई पटेल, प्रा. शाहिद इकबाल खान, सरचिटणीस राजेश शिंदे, कार्यकारी सदस्य महादेवराव जानकर, दीपक लुंगे, प्रकाश कळंब, संतोष कोगदे यांनी भेट दिली. यावेळी प्रा. शाहिद इकबाल खान यांना महाराष्ट्र शासनाचा कोरोनायोद्धा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा निरंजन महाराज संस्थानचे अध्यक्ष संजय महाराज काकड यांनी सत्कार केला. ज्येष्ठ पत्रकार जेठाभाई पटेल यांचाही सत्कार करण्यात आला. संगीत संस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवाधिकारी शंकरराव अढाऊ, त्र्यंबकराव काकड परिश्रम घेत आहेत.
फोटो: