अकोला : स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी १५ ते २३ फेब्रुवारीदरम्यान विविध उपक्रम राबवण्यासोबतच घरोघरी स्वच्छता दिवाळी साजरी करण्याचाही उपक्रम राबविण्याची तयारी जिल्ह्यातील शाळांमध्ये केली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून पालकांना माहिती दिली जाणार आहे. तसेच त्या दिवशी गावातून प्रभातफेरी काढून त्याद्वारेही जनजागृती होणार आहे. कार्यमुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तसे पत्र गुरुवारीच शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले आहे.गेल्या वर्षी २३ फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यातील सर्वच सरकारी, खासगी शाळांमध्ये स्वच्छतेची शपथ घेऊन विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छतेचा संदेश दिला होता. यावर्षीही तोच उपक्रम पुढे सुरू ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यानुसार १५ ते २३ फेब्रुवारीदरम्यान स्वच्छताविषयक कार्यक्रम आयोजित करणे, त्यादरम्यान जनजागृतीचे उपक्रम राबवले जाणार आहेत.२३ फेब्रुवारी रोजी ‘स्वच्छता दिवाळी’ हा उपक्रम राबवण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून पालकांना माहिती दिली जाईल. उपक्रम यशस्वी करण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांनी आपले घर परिसर स्वच्छ करणे, केरकचºयाची विल्हेवाट लावणे, अंगणात सडा-रांगोळी काढून सजावट करणे, ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक, ग्रामस्थांनी प्रभातफेरी काढून स्वच्छतेच्या घोषणा देण्याचेही ठरवून देण्यात आले.
- अस्वच्छतेबाबत जनजागृतीसार्वजनिक अन्नदान कार्यक्रमामध्ये होणाºया अस्वच्छतेबाबत जनजागृती करणे, त्यामध्ये अन्नाची नासाडी होते, उरलेले अन्न, उष्ट्या पत्रावळ््या, द्रोण, पाण्याचे ग्लास उघड्यावर फेकले जातात. ते खाल्ल्याने जनावरांना विषबाधा होऊन ते आजारी पडतात. त्यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक नुकसानही होते. याबाबत प्रामुख्याने जागृती केली जाणार आहे.