अकोला: विद्युत ग्राहकांना सुरक्षित व अखंडित वीज पुरवठा मिळावा म्हणून महावितरणच्याअकोला परिमंडळात रोहित्र व खांबावरील वेली आणि झाडांच्या फांद्या काढण्याची विशेष मोहीम राबविली. मोहिमेंतर्गत परिमंडळातील २ हजार ९०६ रोहित्र व खांब वेलीमुक्त केले. यासाठी अभियंते व जनमित्रांनी विशेष भूमिका बजावली.महावितरणच्याअकोला परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या संकल्पनेतून ही मोहीम परिमंडळातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम मंडळात एकाच वेळी राबविण्यात आली. विद्युत यंत्रणेवर चढलेल्या वेली व रोपटी यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन ग्राहकांसोबत महावितरणलादेखील त्रास होतो. शिवाय, महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी महवितरणतर्फे ही विशेष मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत अकोला परिमंडळातील सर्व मंडळ, विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयांमध्ये स्थित असणारी शहरे व गावांमध्ये महावितरणच्या खांबावर वेली किंवा रोहित्र लगतची झाडे-झुडपे स्वच्छ करण्यात आली आहेत. अकोला मंडळामध्ये अकोला ग्रामीण विभागात १०१९, अकोला शहर विभागात ३१०, अकोट विभागात २४५ असे एकूण एक हजार ५७४ विद्युत खांब व रोहित्र वेलीमुक्त करण्यात आलेत. बुलडाणा विभागात २३९, खामगाव विभागात(३८४), मलकापूर विभागात ६२१ असे एकूण १ हजार २४४ बुलडाणा मंडळात, तर वाशिम मंडळात एकूण ८८ रोहित्र व खांब वेलीमुक्त करण्यात आले आहेत.मुख्य अभियंत्यांनी स्वत: केली पाहणीप्रभारी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी मोहिमेदरम्यान अकोला शहरातील विविध ठिकाणी स्वत: पाहणी केली. त्यांच्या सोबत मोहिमेमध्ये सर्व अधिकारी, कार्यकारी अभियंते, अतिरिक्त उपकार्यकारी, सहायक अभियंते, यांनी कार्यालयीन कर्मचारी व जनमित्रासह यांच्यासह ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.
...तर महावितरणला सूचित करापरिसरात धोकादायक वीज यंत्रणा किंवा असुरक्षित बाबी आढळल्यास ग्राहकांनी तत्काळ महावितरणच्या जवळच्या कार्यालयात किंवा १८००२३३३४३५, १८००१०२३४३५ वा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले.