शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

‘एमआयडीसी’तील प्रलंबित कामे मार्गी लावा; ‘मिनी फूड पार्क’ साठी पाठपुरावा करा !

By संतोष येलकर | Published: May 13, 2023 6:01 PM

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक

अकोला: महाराष्ट्र आैंद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अकोल्यातील औद्योगिक वसाहतमधील प्रलंबित कामे प्राध्यान्याने मार्गी लावून, जिल्ह्यातील प्रस्तावित ‘ मिनी फूड पार्क’ संदर्भात प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत शुक्रवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला आमदार वसंत खडेलवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे, माविमच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे, महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळचे प्रादेशिक अधिकारी दिगांबर पारधी, एमएसईसीबीचे कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट, जिल्हा नियोजन सहायक अधिकारी कैलाश देशमुख, अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेष मालू, निरेश बियाणी, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशिष चंदाणी, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व अकोला उद्योग संघटनेचे सदस्य उपस्थित होते. औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना येणाऱ्या अडचणी तसेच त्यानुषंगाने करावयाच्या उपाययोजना संदर्भात यावेळी आढावा घेण्यात आला.            या बैठकीत जिल्हयात कार्यरत असलेल्या उद्योगांना येणाऱ्या विविध अडचणी उद्योजकांनी मांडल्या. त्यामध्ये ‘ एमआयडीसी ‘मधील रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट, पोलिस चौकी, वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा, अतिक्रमणामुळे होणारे अपघात, कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वैद्यकीय सुविधा यासारख्या समस्या मांडण्यात आल्या. या समस्या संबंधित विभागांनी आपापसात समन्वय साधून सोडवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित विभागांना दिले. उद्योजकांचे प्रलंबित असलेले प्रस्ताव प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करुन तातडीने मार्गी लावावे,अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

................................

उद्योजकांच्या अडचणी तातडीने

मार्गी लावा : आ.वसंत खंडेलवाल

औद्योगिक वसाहतमधील उद्योजकांना येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावण्याचे सांगत, कामकाजात हयगय करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात यावी आणि वेळप्रसंगी कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार वसंत खंडेलवाल यांनी यावेळी दिले. तसेच जिल्ह्यातील प्रस्तावित मिनी फुड पार्ककरिता प्रशासकीयस्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

टॅग्स :MIDCएमआयडीसी